शुक्रवारपासून सोलापुरात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

Internatioanl Film Festival in Solapur
Internatioanl Film Festival in Solapur

सोलापूर : प्रिसिजन फाऊंडेशनच्यावतीने 16 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत सोलापुरात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजिला आहे. प्रभात टॉकीज आणि भागवत उमा मंदिर येथे सोलापूरकरांना जगभरातील विविध विषयांवरील दर्जेदार, आशयघन चित्रपट पाहता येणार आहेत.

चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर, गजेंद्र अहिरे यांच्यासह तरुण दिग्दर्शक महोत्सवास उपस्थित राहणार असल्याची माहिती ज्येष्ठ दिग्दर्शक तथा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल आणि प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. 

प्रिसिजन गप्पा आणि प्रिसिजन संगीत महोत्सव कार्यक्रमांना सोलापूरकरांचा प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्‍वभूमीवर सोलापूरकरांचे चित्रपट प्रेम लक्षात घेऊन यंदा दुसऱ्या वर्षीही पुणे फिल्म फाउंडेशनच्या सहकार्याने चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे.

शुक्रवारी (ता. 16) सायंकाळी 6.25 वाजता प्रभात टॉकीज येथे महोत्सवाचे उद्‌घाटन होईल. यावेळी प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर उपस्थित राहतील. उद्‌घाटनानंतर 'आय ऍम नो बडी' हा तुर्कस्तानातील चित्रपट दाखविण्यात येईल, असे शहा यांनी सांगितले. 

महोत्सवासाठी नाव नोंदणी आवश्‍यक असून प्रभात टॉकीज, भागवत उमा मंदिर, कॉटनकिंग, प्रिती केटरर्स, साई सुपर मार्केट, पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स, एस. के. कॉम्प्युटर्स, विद्या कॉम्प्युटर्स या ठिकाणी नोंदणी करता येईल.

या पत्रकार परिषदेस दीपक पाटील, भरत भागवत, माधव देशपांडे, आदित्य गाडगीळ आदी उपस्थित होते. 

कलाकारांची क्रेझ टीव्ही माध्यमामुळे कमी झाली आहे. दहा वर्षांपूर्वीचा चित्रपट आता इतिहास वाटायला लागला आहे. जगभर विविध विषयांवरील छान चित्रपट बनत आहेत. लोकांनी चित्रपटांकडे गांभीर्याने पहावे म्हणून सोलापुरात हा चित्रपट महोत्सव आयोजिला आहे. 
- डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ दिग्दर्शक 

सोलापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची यंदाच्या वर्षीची थीम युथ आहे. महोत्सवातील चित्रपट हे युवकांशी संबंधित असतील. जागतिक परिस्थिती कळविण्यासाठी हे चित्रपट तरुणाईला उपयुक्त ठरतील. महोत्सवात वीस पैकी सात चित्रपट भारतीय असून त्यातील तीन मराठी आहेत. 
- डॉ. सुहासिनी शहा, अध्यक्षा, प्रिसिजन फाउंडेशन 

चित्रपट महोत्सवाचे वेळापत्रक 
प्रभात टॉकीज- 

  • शनिवार (ता. 17) : सकाळी 10.30- मार्सेलो मचादो दिग्दर्शित ट्रॉपीसेलिया. दुपारी 12.30 ते सायंकाळी 7.30 यावेळेत स्टुडंट सेक्‍शनमधील चित्रपट दाखविण्यात येतील. सायंकाळी 7.30- राल्स्टन जोवर दिग्दर्शित द बॉंब. 
  • रविवार (ता 18 फेब्रुवारी) : सकाळी 10.30- जुआन मोरेइरा. दुपारी 12.30- गिरीश मोहिते दिग्दर्शित सर्वनाम. दुपारी 2.30- द रिटर्न ऑफ द हनी बझार्ड. सायंकाळी 4.30- प्रियानंदन दिग्दर्शित नॉक्‍टर्नल टाईम्स. सायंकाळी 7- ब्लॉसमिंग इनटू ए फॅमिली. 

भागवत उमा मंदिर

  • शनिवार (ता. 17) : सकाळी 10.15- होलीकाऊ. दुपारी 12- गजेंद्र अहिरे दिग्दर्शित पिंपळ. दुपारी 2.30- वाईल्ड टेल्स. सायंकाळी 5- क्राय ह्यूमॅनिटी. सायंकाळी 7- किल्स ऑन व्हील्स. 
  • रविवार (ता. 18) : सकाळी 10.15- द सिक्रेट इन देअर आईज. दुपारी 1- अश्‍वत्थामा. दुपारी 3.15- पळशीची पी.टी., सायंकाळी 5.30- बल्लाड फ्रॉम तिबेट. सायंकाळी 7.30- टेक ऑफ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com