वरुण धवनला मुंबई वाहतुक पोलिसांचे ई-चलान 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 नोव्हेंबर 2017

फॅनची सोबत सेल्फी काढण्याची ईच्छा पुर्ण करण्याच्या नादात अभिनेता वरुण धवणने वाहतूक नियमाचे उल्लंघन केले आहे. ज्यामुळे मुंबई वाहतुक पोलिसांकडून वरुणला ई-चलान देण्यात आले. 

मुंबई - वाहतूकीचे नियम सर्वांना सारखेच. मग ती व्यक्ती कुणी सेलिब्रिटी का असेना. याचा प्रत्यय नुकताच मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये चॉकलेट बॉय अभिनेता वरुण धवनलाही आला आहे.

प्रसिद्ध व्यक्तींच्या मागे सामान्यांचा गराडा असतोच. आणि त्यात ती प्रसिद्ध व्यक्ती एखादी चित्रपट सृष्टीतील सेलिब्रिटी असेल तर ते जिथे जातील तिथे त्यांचे फॅन त्यांना फॉलो करत असतात. अशाच एका फॅनची सोबत सेल्फी काढण्याची ईच्छा पुर्ण करण्याच्या नादात अभिनेता वरुण धवनने वाहतूक नियमाचे उल्लंघन केले आहे. ज्यामुळे मुंबई वाहतुक पोलिसांकडून वरुणला ई-चलान देण्यात आले.

थांबलेल्या सिग्नलमध्ये वरुण आपल्या गाडीत बसून त्याच्या गाडीच्या बाजूला उभ्या असलेल्या रिक्षात बसलेल्या त्याच्या फॅन सोबत सेल्फी काढतांनाचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. हा फोटो शेअर करीत मुंबई पोलिस विभागाने ट्विटर अकाउंटवरुन 'अशी साहसी कामे चित्रपटातच शोभून दिसतात, मुंबईच्या रस्त्यांवर नाही. खऱ्या आयुष्यात असे केल्यास स्वतःचा आणि स्वतःच्या चाहत्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. यानंतर असे करताना आढळल्यास ई-चलानपेक्षा अधिक कठोर कारवाई करु' असे खडसावले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi News varun dhavan took a selfie on street