रिसेप्शनमध्ये विरुष्काचा 'छैय्या छैय्या'

शनिवार, 30 डिसेंबर 2017

मुंबई - अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी मुंबईच्या सेंट रेगिजमध्ये मंगळवारी रिसेप्शन पार्टी दिली. या पार्टीत विशेषतः बॉलिवूड आणि क्रिकेट क्षेत्रातील नवे-जुने असे सगळेच चेहरे बघायला मिळाले.

मुंबई - अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी मुंबईच्या सेंट रेगिजमध्ये मंगळवारी रिसेप्शन पार्टी दिली. या पार्टीत विशेषतः बॉलिवूड आणि क्रिकेट क्षेत्रातील नवे-जुने असे सगळेच चेहरे बघायला मिळाले.

या पार्टीच्या अतिथी यादीत शाहरुख खान, रेखा, बिग बी, माधुरी दिक्षित, एैश्वर्या राय-बच्चन, अभिषेक बच्चन, प्रियंका चोप्रा, कंगना राणावत, कॅटरीना कैफ यांच्यासोबतच ग्लॅमर जगतातील काही नवे चेहरेही बघायला मिळाले. सारा अली खान, सारा तेंडूलकर, भूमि पेडणेकर, किर्ती सेनन, साक्षी धोनी यांनी देखील मैफिलित रंग आणलेत. या रिसेप्शन पार्टीत शाहरुख
खानबरोबर विरुष्काने  'छैय्या छैय्या' या शाहरुखच्या गाण्यावर आणि पंजाबी गाण्यावर डान्स केला.   

विराट आणि अनुष्काने सब्यसाची आणि राघवेंद्र राठोड यांनी डिझाइन केलेले कपडे परिधान केले होते. अनुष्का सिक्वेंन स्मोकी ग्रे लेहेंग्यात आकर्षक दिसत होती तर  विराटने इंडिगो मखमल बंधुगाला आणि सिल्क पँट अशी वेशभूषा केली होती. रोझकट असलेला हिऱ्यांचा नेकपिस आणि जपानी बरॉक् मोत्यांचे इअररींगज् लेहेंग्यावर शोभून दिसत होते.  

या रिसेप्शन पार्टीतील काही खास पाहुणे...

Web Title: Marathi News Virat Kohli Anushka Sharma Second Wedding Reception Mumbai