Bigg Boss Marathi 4: 'तू संपलीस समज...', म्हणत अपूर्वानं तेजस्विनीला अक्षरशः फरफटत नेलं

कॅप्टन पदासाठीचा अधिकार मिळवण्यासाठी दोन टीम मध्ये लढत सुरु असताना तेजस्विनी आणि अपूर्वामधील झटापटीचा प्रोमो जोरदार व्हायरल झाला आहे.
Bigg Boss Marathi 4: Apurva Nemlekar -Tejaswini Lonari argument during the task
Bigg Boss Marathi 4: Apurva Nemlekar -Tejaswini Lonari argument during the taskGoogl

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठी शो जसजसा पुढे सरकत चालला आहे तसतशी या खेळाची रंगत वाढत चाललीय. कॅप्टनशीपसाठी खेळवले जाणारे टास्क तर दिवसागणिक कठीण बनत चालले आहेत. पण असं असलं तरी प्रत्येक सदस्यही आता पुरते मुरलेयत या खेळात त्यामुळे टास्क दरम्यान जीवाची पर्वा न करता, कुठलीही भीती मनात न बाळगता जीव तोडून टास्कमध्ये खेळताना दिसतायत. मुलं नाही तर मुली देखील कमी नाहीत बरं का. असं का म्हणतोय आम्ही ते कळेलच तुम्हाला पुढे. (Bigg Boss Marathi 4: Apurva Nemlekar -Tejaswini Lonari argument during the task)

आता आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की घरात दोन टीम आहेत. ज्यांच्यात कॅप्टनपदाच्या अधिकारावरनं आज लढत होणार आहे. आता टास्क होता. घरात हत्तीचा एक स्टॅच्यू आणलाय,ज्याच्या गळ्यात जी टीम जास्तीत जास्त रीबन्सचा हार करुन गुंडाळेल त्यांना कॅप्टन पदाचा अधिकार मिळणार आहे. दोन्ही टीमला यासाठी वेगवेगळया रंगाच्या रीबन दिल्या आहेत. आणि यासाठी अक्षरशः प्रत्येकजणं एकमेकांवर तुटून पडताना दिसतो. तो प्रोमो आम्ही इथं बातमीत जोडलेला आहे.

Bigg Boss Marathi 4: Apurva Nemlekar -Tejaswini Lonari argument during the task
Bigg Boss 16: असं काय घडलं की भांडखोर अर्चना गौतमसोबत लग्न करायचं म्हणतोय शिव ठाकरे,वाचा..

या प्रोमोत आपण पाहू शकतोय,कॅप्टनपदाच्या अधिकारासाठी दोन्ही टीमचे सदस्य एकमेकांच्या झिंजा उपटताना दिसत आहेत. त्या दरम्यान अपुर्वा आणि तेजस्विनीनं एकमेकींना पकडून ठेवलंय. त्यांच्या झटापटीत तेजस्विनीकडून अपुर्वाला धक्का लागतो,तर रागानं अपूर्वा तिला सुनावते,''तू मला ढकललंस,आता तू संपलीस..'' याच रागात अपूर्वा तेजस्विनीच्या टीममधील प्रसादलाही जोरदार लगावते असंच काहीसं प्रोमोत दिसतंय. आता हा सगळा बिग बॉसच्या घरातील राडा आज रात्री पाहिल्यावर स्पष्ट काय ते कळेलच,आणि एवढ्या लढ्यानंतर कोणती टीम कॅप्टन पदाच्या अधिकाराची मानकरी ठरते ते देखील कळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com