शिवानी रांगोळे होणार मृणाल कुलकर्णींची सुनबाई, विराजसचा साखरपूडा

विराजस हा मराठीतील प्रख्यात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे.
शिवानी रांगोळे होणार मृणाल कुलकर्णींची सुनबाई, विराजसचा साखरपूडा

मुंबई - मराठी मनोरंजन (Marathi Entertainment) क्षेत्रातील लोकप्रिय मालिका माझा होशील का यातील प्रमुख कलाकार विराजस कुलकर्णीची (Virajas Kulkarni) गुड न्युज (Good News) समोर आली आहे. त्याचा शिवानी रांगोळेसोबत (Shivani Rangole) साखरपूडा झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. विराजस हा मराठीतील प्रख्यात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. मृणाल यांनी केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपटामध्ये देखील आपल्या अभिनयाची ओळख प्रेक्षकांना करुन दिली आहे. मराठीतील वेगवेगळ्या ऐतिहासिक मालिकांमध्ये देखील त्यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. त्यांच्या अभिनयाचा वारसा आता विराजस समर्थपणे पुढे नेताना दिसतो आहे.

विराजस आणि शिवानी
विराजस आणि शिवानी

मृणाल (Mrinal Kulkarni)यांनी मराठी आणि हिंदीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. बारावीत शिकत असताना त्यांनी 'स्वामी' या मालिकेत पहिल्यांदा काम केले होते. आईप्रमाणे विराजस ही अभिनेता आहे. विराजसचा जन्म पुण्यात झाला. त्याने एसपीएम इंग्लिश मीडियम स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि नंतर महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन कॉलेजमधून घेतलं.. विराजसनं माझा होशील ना या मालिकेतून प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या विराजसच्या साखरपुड्याच्या बातमीनं त्याच्या चाहत्यांना कमालीचा आनंद झाला आहे. त्याच्या एंगेजमेंटचे काही फोटोही सोशल मीडीयावर व्हायरल झाले आहेत. माझा होशील ना या मालिकेत त्याने आदित्यची भूमिका साकारली होती. विराजस हा खूप चांगला लेखक आणि दिग्दर्शक असून त्याने हॉस्टेल डेज या चित्रपटात काम केले होते.

विराजस आणि शिवानी रांगोळे
विराजस आणि शिवानी रांगोळे

विराजस सोशल मीडियावर सातत्यानं फोटो आणि व्हिडीओ तो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो आणि या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत संवाद साधत असतो. विराजस अभिनेत्री शिवानी रांगोळेला डेट करत असल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून आहे, सोशल मीडियावर दोघे एकमेंकासोबतचे फोटो शेअर करत असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com