‘लागिरं झालं जी’ मालिका होणार बंद; आज्या शितलीच्या निरोपाची तारीख ठरली!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 जून 2019

आज्या आणि शितलीची प्रेमकहाणी अल्पावधीतच लोकप्रिय ठरली.पण आता लागिरं झालं जीच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. ‘लागिरं झालं जी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.या मालिकेचा चाहता महाराष्ट्रातील घराघरात पोहचला आहे.

मुंबई : आज्या आणि शितलीची प्रेमकहाणी अल्पावधीतच लोकप्रिय ठरली.पण आता लागिरं झालं जीच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. ‘लागिरं झालं जी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.या मालिकेचा चाहता महाराष्ट्रातील घराघरात पोहचला आहे. 

अभिनेत्री शिवानी बावकर, नितिश चव्हाण, राहुल मगदूम, निखिल चव्हाण हे सगळे कलाकार या मालिकेमुळे चांगलेच प्रकाशझोतात आले. महत्त्वाचे म्हणजे या मालिकेमुळे चांदवडी या पुनर्वसित गावातील लोकांना रोजगार मिळाला. चांदवडी हे गाव महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहोचलं. मालिकेतील आपले लाडके कलाकार आज्या, शितली, राहुल्या, भैय्यासाहेब यांची एक झलक बघण्यासाठी गावात गर्दी होऊ लागली. पण आता लागिरं झालं जीच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे.

अडीच वर्षांपूर्वी सुरु झालेला हा संस्मरणीय प्रवास अखेर थांबतोय. मालिकेचा शेवट कसा होणार याची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागली आहे.  येत्या 22 जून रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. या मालिकेच्या जागी मिसेस मुख्यमंत्री ही नवी मालिका सुरु होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi serial lagir zala ji all set close down