esakal | ५ नोव्हेंबरपासून नाट्यगृह होणार सुरु, पण...
sakal

बोलून बातमी शोधा

५ नोव्हेंबरपासून नाट्यगृह होणार सुरु, पण...

५ नोव्हेंबरपासून नाट्यगृह होणार सुरु, पण...

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कोरोनाचा मोठा फटका मनोरंजन क्षेत्राला बसला होता. गेल्या काही दिवसांपासून ना्टयगृहे सुरु करावी. अशी मागणी निर्माते आणि दिग्दर्शकांकडून केली जात होती. मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले होते. यापूर्वी अनेकदा कलाकारांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले होते. नाट्यगृह सुरु करावी अशी त्या निवेदनामध्ये प्रमुख मागणी करण्यात आली होती. सातत्यानं त्या मागणीचा पाठपुरावा केल्यानं नाट्यकलाकारांच्या लढ्याला यश आलं आहे. अखेर मुख्यमंत्र्यांनी ५ नोव्हेंबरपासून नाट्यगृह सुरु करण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र त्यासाठी काही अटीही घालून दिल्या आहेत.

नाट्यगृहं पन्नास टक्के क्षमतेनं सुरु कऱण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यामुळे कलाकारांना दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून बॅक स्टेज कलाकारांना मोठ्या आर्थिक समस्येला सामोरं जावं लागत असल्याचे दिसुन आले होते. अखेर त्यांना दिलासा देण्याचं काम सरकारनं केलं आहे. पाच नोव्हेंबर रोजी रंगभूमी दिन आहे. त्यानिमित्तानं नाट्यगृह सुरु केली जाणार आहेत. कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक यांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे. काही दिवसांपासून मनोरंजन विश्वातील अडचणी वाढू लागल्या होत्या. त्यांना मदत करण्यासाठी काही कलाकारांनी पुढाकार घेतला होता. त्यातील एक प्रमुख अडचण म्हणजे थिएटर चालकांना अजूनही थिएटर सुरु करण्याची परवानगी दिलेली नव्हती. परवानगी मिळावी म्हणून यापूर्वी अनेकदा कलाकारांनी अनेकदा मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली होती. यावेळी शासनाकडून कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्यात यावे. असे आवाहनही कलाकारांना करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

हेही वाचा: खुली नाट्यगृहे हाच आमचा ऑक्सिजन...!

सरकारला जाग यावी यासाठी काही दिवसांपूर्वी पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरासमोर महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. चित्रपटगृहे तसेच नाट्यगृहे १ सप्टेंबरपासून सुरू होतील असे आश्वासन सरकारतर्फे देण्यात आले होते. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी रंगकर्मींची चर्चा झाली होती. परंतु अद्याप चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे उघडण्याचा कोणताही निर्णय झाला नव्हता. त्यामुळे रंगकर्मी शिवाजी मंदिरच्या गेटसमोर ३० ऑगस्ट रोजी संध्याकाळी सात वाजता महाआरती करण्यात आली होती.

loading image
go to top