'आई माझी काळुबाई' मालिकेत नवा बदल; आर्याच्या भूमिकेत नवा चेहरा

'आई माझी काळुबाई' मालिकेत नवा बदल; आर्याच्या भूमिकेत नवा चेहरा

छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली लोकप्रिय मालिका म्हणजे आई माझी काळूबाई. ही मालिका सुरु झाल्यापासून सातत्याने चर्चेत येत आहे.  अभिनेत्री अलका कुबल यांची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेत सध्या अनेक रंजक वळण पाहायला मिळत आहे. त्यातच आता या मालिकेत एका नव्या अभिनेत्रीची एण्ट्री झाली आहे. विशेष म्हणजे ही अभिनेत्री आर्या ही भूमिका साकारणार आहे. यापूर्वी अभिनेत्री वीणा जगताप, आर्या ही व्यक्तिरेखा साकारत होती.

'आई माझी काळुबाई' या मालिकेत प्रथम प्राजक्ता गायकवाड, आर्या ही भूमिका साकारत होती. त्यानंतर प्राजक्ताने या मालिकेतून काढता पाय घेतला. त्यामुळे ही भूमिका वीणा जगतापच्या वाट्याला आली होती. मात्र, आता वीणानेदेखील या मालिकेला रामराम केला आहे. त्यामुळे या मालिकेत अभिनेत्री रश्मी अनपट मुख्य भूमिका साकारणार आहे. 

पुण्यात शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेताना रश्मीवर नाट्यसंस्कार झाले आहेत. यापूर्वी तिने ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘स्वभावाला औषध नाही’, ‘गाठीभेटी’ या नाटकांमध्ये काम केलं आहे. तसंच काही मालिकांमध्येही ती झळकली आहे.

'आई माझी काळुबाई' या मालिकेत सध्या विराटच्या आसुरी प्रभावाखाली असलेले पाटील विरुद्ध श्रद्धा-भक्तीचे पाठबळ असलेले  पुरोहित  कुटुंब यांच्यातला संघर्ष शिगेला पोचला  आहे. या महत्त्वाच्या  टप्प्यावर  रश्मीने साकारलेली आर्या प्रेक्षकांसाठी विशेष पर्वणी असेल. 

दरम्यान, या मालिकेत विवेक सांगळे, अलका कुबल-आठल्ये, शरद पोंक्षे, मिलिंद शिंदे, प्रसन्ना केतकर, संग्राम साळवी, अनिकेत केळकर, मंजूषा गोडसे, स्मिता ओक, प्राजक्ता दिघे, जान्हवी किल्लेकर, लीना दातार, पार्थ केतकर, शुभंकर एकबोटे  ही कलाकार मंडळी झळकली आहेत. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com