अभिनेता सचित पाटीलचं टेलिव्हिजनवर धमाकेदार पुनरागमन

२३ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या ‘अबोली’ मालिकेत दिसणार पोलिसाच्या भूमिकेत
sachit patil
sachit patil
Updated on

येत्या २३ नोव्हेंबरपासून स्टार प्रवाह वाहिनीवर अबोली Aboli ही नवी मालिका सुरु होतेय. या मालिकेत अभिनेता सचित पाटील Sachit Patil इन्स्पेक्टर अंकुश ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. सचितला याआधी ग्लॅमरस रुपात आपण पाहिलं आहे. त्यामुळे अबोली मालिकेतला त्याचा हा नवा अंदाज प्रेक्षकांना आवडेल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

या भूमिकेविषयी सांगताना सचित म्हणाला, ‘मी खूपच उत्सुक आहे. मी पहिल्यांदाच स्टार प्रवाहसोबत काम करतोय. या वाहिनीचा मी खूप मोठा चाहता आहे. लिखाणाच्या दर्जापासून कलाकारांचा अभिनय आणि दिग्दर्शन या सर्व गोष्टी मला भावतात. त्यामुळे खूप दिवसांपासून या कुटुंबाचा भाग होण्याची इच्छा होती. अबोली मालिकेच्या निमित्ताने हा योग जुळून आलाय. या मालिकेत मी इन्स्पेक्टर अंकुश ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. मी माझ्या करिअरच्या पहिल्या सिनेमात पोलिस इन्स्पेक्टरची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता अबोली मालिकेत मी पुन्हा खाकी वर्दी परिधान करणार आहे. मालिकेचा विषयही खूप छान आहे."

अबोली नावाच्या मुलीच्या संघर्षाची गोष्ट या मालिकेत दाखवण्यात येणार आहे. "छोट्या पडद्यामुळे तुम्ही दररोज प्रेक्षकांच्या घरात पोहोचता, त्यांच्या कुटुंबाचा भाग होता. अबोली मालिकेच्या निमित्ताने माझी प्रेक्षकांशी नेहमी भेट होईल त्यामुळे उत्सुकता वाढली आहे," अशी भावना सचितने व्यक्त केली. ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com