अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यूचे बॉलिवूड पदार्पण; ट्रेलर रिलीज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

राधिका मदान या सिनेमात अभिमन्यूची सहकलाकार असेल. ती त्याची लहानपणापासूनची मैत्रीण दाखविली आहे. राधिकाचेही सिनेमात अॅक्शन सीन्स् आहेत. 

मुंबई : 'मैंने प्यार किया' फेम अभिनेत्री भाग्यश्री हिचा मुलगा अभिमन्यू बॉलिवूडमध्ये एंन्ट्री करण्याच्या चर्चा खूप दिवसांपासून सुरु होत्या. 'मर्द को दर्द नही होता' या सिनेमातून अभिमन्यू बॉलिवूड डेब्यू करण्यास सज्ज आहे. सिनेमाचा ट्रेलरही नुकताच रिलीज झाला आहे. 

कुठलीही शारिरीक वेदना न होणाऱ्या पुरुषाची ही कथा आहे. अभिमन्यूला एक विशिष्ट आजार जन्मताच असतो. ज्यामुळे त्याच्या शरिरावर जखम झाली, रक्त आलं किंवा तत्सम कुठलीही वेदना त्याला जाणवत नाही. असे सिनेमात दाखविण्यात येईल हे ट्रेलर बघितल्यावर कळते. 

राधिका मदान या सिनेमात अभिमन्यूची सहकलाकार असेल. ती त्याची लहानपणापासूनची मैत्रीण दाखविली आहे. राधिकाचेही सिनेमात अॅक्शन सीन्स् आहेत. 

वसन बाला यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. 'लंचबॉक्स' आणि 'रमन राघव' या सिनेमांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून बाला यांनी याआधी काम पाहीले आहे. आता भाग्यश्रीच्या मुलाचे बॉलिवूड पदार्पण किती यशस्वी ठरते हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.    

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mard Ko Dard Nahi Hota Movie Trailer Release