esakal | जॅकीला राजकारणात जायचयं, सीपीसी पक्षाशी जवळीक
sakal

बोलून बातमी शोधा

Jackie Chan

जॅकीला राजकारणात जायचयं, सीपीसी पक्षाशी जवळीक

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - जगात आताच्या घडीला जे अॅक्शन हिरो (action hero) आहेत त्या सर्वांना प्रेरणा आणि आदरास्थानी असणारा जॅकी चॅन अजूनही कार्यरत आहे. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह (social media) राहून तो फॅन्सच्या संपर्कात असतो. बॉलीवूडमध्ये त्याचे मोठ्या प्रमाणावर फॅन्स आहेत. केवळ भारतीय सेलिब्रेटींनाच राजकारणाची क्रेझ आहे असं नाही तर हाँगकाँगमध्ये राहणाऱ्या जॅकीला देखील आता राजकारणात प्रवेशाची ओढ लागल्याचे दिसून आले आहे. त्याचा कल सध्या सत्ताधारी कम्युनिस्ट (communist party of china) पक्षाकडे असल्याची चर्चा आहे. वैयक्तिक जॅकीचीही तशी इच्छा आहे. (Martial arts legend Jackie Chan wants to join China ruling Communist Party)

वास्तविक गेल्या अनेक वर्षांपासून जॅकी (jackie) ही सीपीसी (cpc) अर्थात कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा समर्थक राहिला आहे. त्यानं कधीही आपली राजकीय ओळख किंवा विचारधारा लपवून ठेवलेली नाही. तो चायनीच पीपल पॉलिटिकल कन्सलटिव्ह कॉन्फरन्सचा सभासदही आहे. एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये जॅकीनं आपल्या मनातील गुपित सांगितलं आहे. सध्या त्याच्या या प्रतिक्रियेला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंती मिळताना दिसत आहे.

आपल्या स्टंटबाजीमुळे जॅकीनं जगभरात अॅक्शन हिरो म्हणून नाव कमावले. त्यानं बॉलीवूडच्या मल्लिका शेरावत या अभिनेत्री बरोबर द मिथ नावाच्या चित्रपटामध्येही काम केले होते. लहानांपासून मोठ्यांपर्यत सर्व स्तरांतील चाहतावर्ग लाभलेला जॅकी हा लोकप्रिय अभिनेता आहे. त्याचा सोशल मीडियावर फॉलोअर्सही प्रचंड आहे. वेगवेगळ्या प्रकारचे स्टंट करताना त्याला अनेकदा दुखापतही झाली आहे. मात्र त्याचा कोणताही परिणाम जॅकीवर झालेला नाही.

हेही वाचा: निळू फुले: खलनायकी मुखवट्यामागचा सच्चा माणूस!

हेही वाचा: आमिरचा लाल सिंग वादाच्या भोवऱ्यात, चित्रिकरण स्थळावर केलं प्रदुषण

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी चायनीज चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यांच्याशी नुकताच संवाद साधला. चायनीज पार्टीचा उत्सवाचे औचित्य साधण्यात आले होते. त्यावेळी जॅकीनं त्यांच्यासमोर आपले विचार व्यक्त केले आहे. जॅकी हा चायना फिल्म असोशिएशनचा उपाध्यक्षही आहे. यावेळी त्यानं आपल्याला सीपीसी पार्टीमध्ये भाग घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असल्या तरी जॅकीच्या चाहत्यांना त्याला आगामी काळात राजकारणात आलेलं पाहायला आवडेल. अशी चर्चा आहे.

loading image