मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्कारांची घोषणा

मंगळवार, 17 एप्रिल 2018

संगीत, नाटक, कला आणि सामाजिक कार्य या क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्यांचे कौतुक केले जाते आणि त्यांना मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

पुण्यातील नोंदणीकृत सार्वजनिक धर्मादाय ट्रस्ट मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी संगीत, नाटक, कला आणि सामाजिक कार्य या क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्यांचे कौतुक केले जाते आणि त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. मंगेशकर कुटुंबियांची ही परंपरा गेल्या 29 वर्षापासून सुरु आहे. यावर्षी देखील 24 एप्रिलला श्री षण्मुखानंद हॉल, सायन येथे या पुरस्काराने मान्यवरांना सन्मानित करण्यात येईल. या कार्यक्रमाला अध्याक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित असतील. मंगेशकर कुटुंबिय गेल्या 75 वर्षापासून दिनानाथ मंगेशकर यांचा पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रम आयोजित केला जातो. आता हा कार्यक्रम करण्याचे हे 76वे वर्ष आहे. 1988 पर्यंत हा पुण्यतिथी कार्यक्रम म्हणजे खाजगी कार्यक्रम होता पण 1988 नंतर सार्वजनिक स्तरावर पुण्यतिथी कार्यक्रम केला जात आहे.

यावर्षी मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्कार सरोद मेस्त्रो उस्ताद अमजद अली खान यांना प्रदान करण्यात येणार आहे. तर मास्टर दिनानाथ मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार आशा भोसले यांना प्रदान केला जाईल. इतर पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत...
मास्टर दिनानाथ मंगेशकर स्पेशल अवॉर्ड - 

  • अनुपम खेर (भारतीय थिएटर आणि सिनेमा यांच्यातील योगदान)
  • शेखर सेन (थिएटर)
  • धनंजय दातार (सामाजिक उद्योजकता)

वाग विलासीनी पुरस्कार -

  • कवी योगेश गौर (साहित्य)

श्रीराम गोगटे पुरस्कार -

  • राजीव खांडेकर (पत्रकारीता)

मोहन वाघ पुरस्कार थिएटर प्रॉडक्शन -

  • अनन्या (बेस्ट ड्रामा ऑफ द इयर)

आशा भोसले पुरस्कार -

  • केंद्र सरकारच्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मेरी बेहलीहोमजी (सामाजिक कार्य आणि सामान्य लोकांच्या समस्या सोडविणे)

'मास्टर दिनानाथजी यांच्या स्मृत्यर्थ, ज्याने गायक, संगीतकार आणि स्टेज आर्टिस्ट म्हणून जे काम करतात ते महाराष्ट्र आणि भारतातील लोकांसाठी प्रेरणास्थान आहे. या दिग्गजांच्या सन्मानार्थ मंगेशकर कुटुंबाने मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान पुरस्कारांचे आयोजन केले आहे. आम्ही आनंदीत आहोत की आतापर्यंत या सोहळ्याला आणि आम्हाला जनतेकडून नेहमीच प्रेम आणि पाठींबा मिळाला आहे.' अशा भावना हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केल्या. 

मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान पुरस्कार कार्यक्रमात पं. बिरजू महाराज आणि ससवती सेन हे कथ्थक नृत्याचे सादरीकरण करतील. पं. अजोय चक्रोबर्ती हे ठुमरीचे गायन करतील तर अनन्दो चॅटर्जी त्यांना तबल्यावर साथ देतील. पं. बिरजू महाराज यांच्या भावमुद्रेसोबत पं. अजोय चक्रोबर्ती यांच्या ठुमरीच्या गायनाने कार्यक्रमाची सांगता होईल. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Master Dinanath Mangeshkar Award Announced