हृतिक रोशन यांचे आजोबा जे. ओम प्रकाश यांचे निधन

वृत्तसंस्था
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

- हृतिक रोशनचे आजोबा जे. ओम प्रकाश यांचे आज (बुधवार) निधन

- ओम प्रकाश यांनी 'आप की कसम' (१९७४) या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यातूनच त्यांनी दिग्दर्शन करण्यास सुरवात केली. 

मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याचे आजोबा जे. ओम प्रकाश यांचे आज (बुधवार) निधन झाले. ते 92 वर्षाचे होते. ओम प्रकाश यांनी 'आप की कसम' (१९७४) या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यातूनच त्यांनी दिग्दर्शन करण्यास सुरवात केली. 

जे. ओम प्रकाश हे अभिनेते राकेश रोशन यांचे सासरे तर पिंकी रोशन यांचे वडील होते. ओम प्रकाश यांनी 'फिल्म युग' या बॅनरअंतर्गत अनेक चित्रपटांची निर्मिती केली. ओम प्रकाश यांचे निधन झाल्याची माहिती हृतिक रोशनने ट्विटरच्या माध्यमातून दिली.

ओम प्रकाश यांनी 'आदमी और अफसाना', 'आशा', 'अफसाना दिलवालों का' या चित्रपटांसह 'आदमी खिलौना है', 'भगवान दादा', 'अपर्ण', 'आस पास' यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तसेच 'आन मिलो सजना', 'आस का पंछी', 'आई मिलन की बेला', 'आँखो आँखो मे', ‘आया सावन झूम के' या चित्रपटातील त्यांची भूमिका चांगलीच गाजली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maternal Grandfather of Hrithik Roshan J Om Prakash Died