Womens Day 2019 : 'बहन कुछ भी पहन'

Max Fashion takes the bold step this womens day with Behen Kuch Bhi Pehen campaign
Max Fashion takes the bold step this womens day with Behen Kuch Bhi Pehen campaign

महिला दिन 2019
पुणे, ता. 8 : 'स्त्रीचे अस्तित्त्व ही तिने परिधान केलेल्या पेहरावाच्या खूप पलिकडे असते,' असे म्हणत 'मॅक्स फॅशन'ने राबवलेल्या 'बहन कुछ भी पहन' या कॅम्पेनची सध्या जोरात चर्चा आहे.

या कॅम्पेन अंतर्गत 'बहन कुछ भी पहन' असे गाणे सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. आजच्या मुलींना उद्देशून या गाण्याचे शब्द संगीतबध्द करण्यात आले आहेत. या गाण्यात म्हटले आहे की, 'तुझ्या पेहरावावरुन लोक तुझ्याविषयी मत बनवतील, पण तो त्याकडे लक्ष देऊ नकोस. लहंगा सारखा स्कर्ट किंवा बॉयफ्रेंडचा शर्ट परिधान कर... बहन कुछ भी पहन...'

सण समारंभ, पार्टी, कॉलेज किंवा आणखी कुठेही तु काय कपडे घालावेत हे तुझ्या मर्जीने असावे. लोक तुला संस्कृतीच्या नावाखाली ऐकवतील, पण ती बडबड ऐकू नकोस, अशा आशयाचे हे गाणे आज आणि प्रत्येक दिवशी 'तिला' तिची निवड करण्याविषयी सांगत आहे. महिला केंद्रित हे गाणे अनुष्का मनचंदा हिने गायले आहे. या गाण्याविषयी मॅक्स फॅशनचे विपणन उपाध्यक्ष जितेन महेंद्र सांगतात, 'महिलांना प्रोत्साहित करण्याचा हा प्रयत्न आहे. तसेच महिलांचा स्व आलोचना करण्याचा दृष्टिकोन आम्हाला बदलायचा आहे. स्वतःवर गोष्टी लादून घेण्याऐवजी आपल्या फॅशनच्या आवडीनुसार त्यांनी निवड करावी.'


Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com