Mazhi Tuzhi Reshimgath: नेहा गुजराती का बोलली? 'माझी तुझी रेशीमगाठ बंद करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mazhi Tuzhi Reshimgath

Mazhi Tuzhi Reshimgath: नेहा गुजराती का बोलली? 'माझी तुझी रेशीमगाठ बंद करा

Mazi Tuzi Reshimgaath: टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध मालिका माझी तुझी रेशीमगाठ ही आता वादाच्या भोवऱ्यात सापडताना दिसत आहे. ती मालिका प्रेक्षकांच्या रडारवर आली आहे. त्याचे कारणही अवाक करणारे आहे. सध्या राज्यातील अनेक मोठमोठे प्रकल्प हे गुजरातला गेले आहे. त्यावरुन राज्यात राजकीय वातावरण पेटले असताना त्याचे पडसाद मनोरंजन विश्वातही उमटल्याचे दिसून आले आहे.

सोशल मीडियावर माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांनी नेहा आणि यश यांच्यातील संभाषण दाखवलं आहे. त्यात नेहा ही चक्क गुजराती भाषेमध्ये संवाद साधताना दिसत आहे. यामुळे नेटकऱ्यांचा तीळपापड झाला आहे. त्यांनी ही मालिकाच बंद करण्याची मागणी केली आहे. वेगवेगळ्या प्रतिक्रिया देऊन आपला राग व्यक्त केला आहे. एकानं तर या संभाषणाचे कनेक्शन सध्याच्या राज्यातील राजकीय घडामोडींशी लावला आहे.

हेही वाचा: Swara Bhasker: 'याच्यापेक्षा मोठं...' ट्रोलर्सला उत्तर देताना स्वरा भलतचं बोलली

राज्यातील प्रकल्प हे आता गुजरातला चाललेच आहेत आता मालिका देखील जाऊ द्या. अशा शब्दांत नेटकऱ्यांनी मालिकेतील कलावंत आणि मेकर्स यांना खडसावले आहे. त्यामुळे या व्हायरल झालेल्या क्लिपवर मेकर्स काय निर्णय घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहे. राज्यातील एकापेक्षा एक मोठे प्रकल्प हे राज्याबाहेर चालले आहेत. कालच आणखी एक प्रकल्प हैद्राबादला गेल्यानं अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: Viral : गुजरातमध्ये पूल कोसळला अन् PM मोदींचं बंगालमधील 'ते' भाषण झालं Viral