'माझी तुझी रेशीमगाठ' मधील अभिनेत्रीचा आई बनण्याबाबत मोठा खुलासाPrarthana Behere | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

prarthana Behere

'माझी तुझी रेशीमगाठ' मधील अभिनेत्रीचा आई बनण्याबाबत मोठा खुलासा

'पवित्र रिश्ता' (Pavitra Rishta)या हिंदी मालिकेतून प्रार्थना बेहरेनं(Prarthana Behere) अभिनयक्षेत्रातील आपल्या प्रवासाला सुरुवात केली पण त्यानंतर 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा','कॉफी आणि बरंच काही','मिस्टर अॅन्ड मिसेस सदाचारी','व्हॉट्स अप लग्न','अजिंक्य','मितवा'असे अनेक मराठी सिनेमे तिनं एकामागोमाग केले अनं मराठी सिनेइंडस्ट्रीत आपलं असं एक स्थान निर्माण केलं. तब्बल ११ वर्षांनी तिनं पुन्हा छोट्या पडद्यावर काम करायचं ठरवलं अनं 'माझी तुझी रेशीम गाठ'(Mazi Tuzi Reshimgath) मालिकेतनं ती नेहाच्या भूमिकेत आपल्याला भेटली.

हेही वाचा: ''तुझ्याशी लग्न कोण करणार?'' क्रिती सननला विचारला होता प्रश्न

अनं घराघरात प्रत्येकाची फेव्हरेट बनून गेली. आज 'परीची आई' म्हणून झालेली ओळख तिला प्रिय वाटते पण म्हणून प्रत्यक्षात आई बनण्याविषयीचं तिचं एक स्पष्ट मत आहे ते तिनं अगदी बिनधास्त सकाळ पॉडकास्टसाठी दिलेल्या मुलाखतीतनं मांडलेलं आहे. नाटक,मालिका,सिनेमा,ओटीटी अशा अनेक माध्यमांविषयीचं तिचं मत तिनं दिलखुलासपणे मांडलं. ते मांडताना तिनं प्रत्येक माध्यमाची बलस्थानं सांगताना आपल्याला कॅमेरा प्रिय असल्यामुळे नाटकाविषयीचं मत मांडलं. जे कदाचित ब-याच नाट्यप्रेमींना आवडणार नाही असं विधान प्रार्थनानं या मुलाखतीत केलं आहे. अर्थात तिनं यामागची तिची कारणंही स्पष्ट केली आहेत. जी खूप इंटरेस्टिंग आहेत. ते ऐकायला आपल्याला ही मुलाखत इथे बातमीत जोडली आहे ती ऐकावी लागेल.

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत परीची आई साकारणाऱ्या नेहाची म्हणजेच अभिनेत्री प्रार्थना बेहरेची मुलाखत इथे जोडलेली आहे.

याच मुलाखतीत प्रार्थनाने अभिनेत्री सई ताम्हणकरला(Sai Tamhankar) एक सल्ला दिलाय. यानंतर सई आणि प्रार्थनामध्ये कॅटफाईट सुरू न झाली तर नवल. सई म्हणेल कदाचित तिला की, 'तु कोण मला सल्ले देणारी'. असो,जोक्स ए पार्ट,पण ऐकण्यात गम्मत आहे हे मात्र खरं. वैभव तत्ववादीसोबत प्रार्थनाचं नाव जोडलं गेलं होतं,अफेअरच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या ज्या त्या दोघांनी कशा एन्जॉय केल्या त्या किस्स्यांनी ही मुलाखत रंगलीय. तर महेश मांजरेकरांची एकेकाळी आपल्यावर कशी दहशत होती हे सांगतानाही ती तिच्या नेहमीच्या कॉमिक स्टाईलच्या हास्यात दंग होऊन गेलीय. तर नक्की ऐका अनेक किस्से,अनुभव आणि थेट बिनधास्त मतांनी भारलेली प्रार्थना बेहरेची ही पॉडकास्ट मुलाखत. बातमीत आम्ही तिची लिकं वर जोडलेली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top