'माझ्या नवऱ्याची बायको' घेणार प्रेक्षकांचा निरोप; सुखदाची सोशल मीडियावर पोस्ट

mazya navryachi bayko
mazya navryachi bayko

मुंबई - छोट्या पडद्यावरील 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. मालिकेतील गुरूनाथ, शनाया आणि राधिका या भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. नुकताच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. 7 मार्चला मालिकेचा शेवटचा भाग प्रसरित झाला. याबद्दल गूरूनाथ म्हणजेच अभिजीत खांडेकरची खरी पत्नी सुखदा खांडेकरने  सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये सुखदाने अभिजीतसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. 

'माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेचा शेवटचा भाग हा आज प्रसारित होणार आहे. अभि…साडे चार वर्ष आणि १३७५ पेक्षा जास्त भाग…मला तुझा अभिमान आहे. तुझं कामाप्रति समर्पण, प्रक्रियेवरील तुझा विश्वास आणि सातत्य हे अकल्पनीय आहे. आम्हाला हा प्रेमळ गुरूनाथ म्हणजेच गॅरी दिल्याबद्दल धन्यवाद .. ही भूमिका तुझ्या शिवाय कोणीच एवढ्या चांगल्या प्रकारे फूलवू शकलं नसतं. त्याची नेहमीच आठवणं येईल.'असं कॅप्शन तिने दिले.

मालिकेचा पहिला भाग हा २२ ऑगस्ट २०१६ रोजी प्रसारित झाला होता. तेव्हा पासून गेल्या पाच वर्षांत या मालिकेने प्रेक्षकांची मन जिंकली. मालिकेला अनेक पुरस्कारसुद्धा मिळाले. तसेच ही मालिका टीआरपीमध्ये टॉपची मालिका होती. या मालिकेचा ट्रॅक बदलल्यामुळे प्रेक्षक नाराज झाले होते. त्यामुळे निर्मात्यांनी मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला. 

मालिकेत राधिकाची भूमिका अनिता दाते ही अभिनेत्री करत होती. तसेच शनाया ही भूमिका रसिका सुनिल ही अभिनेत्री करत होती,पण त्यानंतर तिची जागा इशा केस्करने घेतली. तसेच अरूण नलावडे, श्वेता मेहंदळे, मिहीर राजदा, शर्मिला शिंदे अशी तगडी स्टार कास्ट या मालिकेची होती.ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने या मालिकेचे चाहते नाराज झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com