Bigg Boss 16 Winner Mc Stan: कोण आहे एमसी स्टॅनची गर्लफ्रेंड 'बूबा'?,खरं नाव काहीतरी भलतंच..HIndi Reality Show | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mc Stan bigg boss 16 Winner

Bigg Boss 16 Winner Mc Stan: कोण आहे एमसी स्टॅनची गर्लफ्रेंड 'बूबा'?,खरं नाव काहीतरी भलतंच..

Mc Stan bigg boss 16 Winner : रॅपर एमसी स्टॅननं बिग बॉस १६ ची चमचमणारी सुंदर ट्रॉफी अखेर स्वतःच्या नावावर केली. विनिंग प्राइज म्हणून त्याला ३१ लाख ८० हजार रुपये आणि एक आलिशान गाडी मिळाली आहे.

त्याच्याच मंडलीतला शिव ठाकरे फर्स्ट रनर अप ठरला आहे. रॅपरनं पहिल्यापासूनच आपल्या अजब व्यक्तीमत्त्वानं आणि अर्थात भाषेनं लोकांचं खूप मनोरंजन केलं.

त्यानं आपल्या हिंदी रॅपनं देशभरात आपली अशी एक वेगळी ओळख बनवली आहे. चला आज खास जाणून घेऊ या एमसी स्टॅनच्या दिलरुबाविषयी..अर्थात बूबा विषयी.(Mc Stan bigg boss 16 Winner who is his girlfriend buba love story of rapper)

बिग बॉसच्या घरात असताना एमसी स्टॅननं अनेकदा बूबाचा विषय काढला होता. तो एकदा म्हणाला होता की तो पाहताक्षणीच तिच्या प्रेमात पडला होता. त्यावेळी तो इतरकुणासोबत तरी रिलेशनशीपमध्ये होता खरंतर.पण जेव्हा वाटलं की बूबाच आपली जोडीदार बनू शकते तेव्हा त्यानं मागचा-पुढचा विचार न करता लगेचच आपल्या पहिल्या गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप केलं होतं.

आणि त्यानंतर एमसी स्टॅन थेट पोहोचला होता बूबाच्या घरी. त्यानं तिथे जाऊ तिला लग्नाची मागणी घातली होती. ज्यानंतर तिच्या कुटुंबानं स्टॅनला त्याच्या आई-वडीलांना आणायला सांगितलं. त्यानंतर मात्र लगेचच बूबा आणि स्टॅनचं नातं फिक्स करण्यात आलं.

एमसी स्टॅनची गर्लफ्रेंड बूबाचं नाव अनम शेख आहे. ती २४ वर्षांची आहे आणि दिसायला खूपच सुंदर आहे. बूबा एमसीसाठी आपले कपडे बिग बॉसमध्ये पाठवायची. एकदा सलमान खाननं स्वतः 'वीकेंड का वार' मध्ये बूबाचे काही टॉप्स त्याला गिफ्टमध्ये दिले होते.

याच टॉपच्या आधारावर एमसी स्ट्रॉंग झाला आणि मग त्या हिमतीच्या बळावर तो केवळ बिग बॉसमध्ये शेवटपर्यंत टिकला नाही तर त्यानं ट्रॉफी देखील पटकावली. ग्रॅन्ड फिनालेला देखील सलमाननं एमसी स्टॅनसाठी बूबाचा टॉप पाठवला होता.

आणि बूबाला फोन लावत एमसी चं त्याच्याशी बोलणं देखील करून दिलं. स्टॅननं अनेकदा शो मध्ये देखील म्हटलं आहे की आता त्याला फक्त बूबाशीच लग्न करायचं आहे.

रॅपरनं पहिल्या दिवसापासून आपल्या हावभावानं,बोलण्यातून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. बिग बॉस १६ च्या प्रिमियरला स्टॅनची संघर्षकथा ऐकून सलमान खाननं देखील त्याची भरभरून प्रशंसा केली होती. एक काळ असा होता की स्टॅनकडे पैसे नसल्यानं रस्त्यावर राहण्याची वेळ आली होती. त्यांच्या कुटुंबाची अवस्था खूपच बिकट होती.

स्टॅनचं खरं नाव अल्ताफ शेख आहे. त्यानं वयाच्या १२ व्या वर्षापासून कव्वाली गायला सुरुवात केली होती. त्यानं प्रसिद्ध रॅपर रफ्तारसोबतही परफॉर्म केलं आहे. त्याला 'वाटा' गाण्यापासून खूप प्रसिद्धि मिळाली.

आज तो एक प्रसिद्ध रॅपर आहे,संगीतकार आहे,गीतकार आहे. एमसी स्टॅनच्या 'समझ मेरी बात को' आणि 'अस्तगफिरुल्लाह' या गाण्यांतून त्याची संघर्ष कथा दाखवण्यात आली आहे.