Me Honar Superstar Chhote Ustaad 2: ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 2’ मध्ये जालन्याच्या संकल्पने मारली बाजी!

Me Honar Superstar Chhote Ustaad 2 Sankalp Kale Wins The
Me Honar Superstar Chhote Ustaad 2 Sankalp Kale Wins The Esakal
Updated on

Me Honar Superstar Chhote Ustaad 2 Sankalp Kale Winner: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय शो 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद' चा दिसरा सीझन गेल्या काही दिवासांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत होता. स्टार प्रवाहवरील या कार्यक्रमात अनेक बाल कलाकारांनी आपल्या आवाजची मोहणी सर्वांवर पसरवली.

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या या शोचा महाअंतिम सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला.

सहा छोट्या उस्तादांमध्ये झालेल्या या महाअंतिम सोहळ्याच्या लढतीत जालन्याच्या संकल्प काळेने बाजी मारली आहे.

Me Honar Superstar Chhote Ustaad 2 Sankalp Kale Wins The
Israel Palestine Conflict: 'ती लोक ढोंगी..' स्वरानं इस्त्राइलवर हल्ला करणाऱ्या पॅलेस्टाईनचे केलं समर्थन

संकल्प काळे सबोतच या महाअंतिम सोहळ्यात श्रुती भांडे, श्रेया गाढवे, सृष्टी पगारे, रागिणी शिंदे आणि काव्य भोईर छोट्या उस्तादांमध्ये शेवटची स्पर्धा रंगली. सर्व छोट्या कलाकारांनी ही स्पर्धा जिंकण्यासाठी आवाजाची बाजी लावली.

त्यामुळे या महाअंतिम सोहळ्यात सुरेल गाण्याची मैफील रंगली होती. या लढतीत जालन्याच्या संकल्प काळेने विजेता ठरला तर अकोल्याची श्रुती भांडे हिने उपविजेते पद मिळवले. यासोबतच नाशिकच्या सृष्टी पगारेने तृतीय क्रमांक मिळवला.

Me Honar Superstar Chhote Ustaad 2 Sankalp Kale Wins The
Mitali Mayekar: "तुझ्या बुद्धीच्या पलीकडे...!" नेटकऱ्याने टिका करताच मितालीचं सडेतोड उत्तर म्हणाली,"तुम्ही क्लास घेता का?"

तर श्रेया गाढवे, रागिणी शिंदे आणि काव्य भोईर यांना देखील त्याच्या कामगिरीसाठी परिक्षकांकडून गौरवण्यात आलं.

विजेता ठरलेल्या संकल्प काळेला 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 2' ट्रॉफी चार लाखांचा धनादेश देण्यात आला.

Me Honar Superstar Chhote Ustaad 2 Sankalp Kale Wins The
Nushrratt Bharuccha: "किती मोठी ड्रामा क्वीन अन् निर्लज्ज बाई", इस्राइलहून भारतात परतणाऱ्या नुसरतवर अभिनेत्याची टीका...

यावेळी संकल्पने स्टार प्रवाहने दिलेल्या संधीबद्दल सर्वाचं आभार मानले. इतक्या दिवसांच्या मेहनतीचं फळ मिळाल्यामुळे आनंद व्यक्त करत त्याने सचिन पिळगावकर, वैशाली सामंत आणि आदर्श शिंदे यांच्याकडून खुप काही शिकायला मिळाल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com