Nushrratt Bharuccha: "किती मोठी ड्रामा क्वीन अन् निर्लज्ज बाई", इस्राइलहून भारतात परतणाऱ्या नुसरतवर अभिनेत्याची टीका...

Nushrratt Bharuccha back to India Israel Hamas
Nushrratt Bharuccha back to India Israel Hamas Esakal
Updated on

KRK On Nushrratt Bharuccha:  सध्या जगभरात इस्त्राइल - पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाने खळबळ उडाली आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी इस्त्राइलवर मोठ्या प्रमाणात रॉकेट सोडले आहेत. इस्राइल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेले युद्ध दिवसेंदिवस आणखी भयावह होताना दिसत आहे. आकडेवारीनुसार, या हिंसाचारामुळे इस्रायलमध्ये आतापर्यंत किमान 600 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 1590 लोक जखमी झाले आहेत.

Nushrratt Bharuccha back to India Israel Hamas
Shahrukh Khan : शाहरूख खानला धोका? मिळाली Y+ सिक्युरिटी; काय आहे कारण

मात्र यासगळ्यात एका बातमीनं बॉलीवूडच्या चाहत्यांचे लक्ष वेधुन घेतले ते म्हणजे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत भरुचाने. ती इस्त्राईलमध्ये अडकून पडल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. इस्त्राइल - पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेल्या युद्धात नुसरत इस्रायलमध्ये अडकली होती.

Nushrratt Bharuccha back to India Israel Hamas
Akshay Kumar: दोगलापन! नकार देऊनही अक्षय कुमार पुन्हा शाहरुख - अजयसोबत दिसला पान मसालाच्या जाहीरातीत

नुसरत हैफा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी इस्राइलला गेली होती. मध्यरात्री तिच्या टीमने नुसरतसोबत संपर्क केला त्यानंतर तिच्याशी संपर्क तुटला. त्यानंतर इस्त्राईलमधील भारतीय दुतावासानं तिची मदत केली आहे.

रविवारी दुपारी तिला भारतात सुखरूप आणण्यात आले. भारतात परतल्यानंतर तिने मीडियाला प्रतिक्रिया देणं टाळलं आणि थेट घर गाठलं.आता कालच्या या संपूर्ण प्रकरणावर अभिनेता कमाल आर खान उर्फ ​​केआरकेने नुसरत भरुचा बाबत एक ट्विट शेयर केलं आणि तिच्यावर टीका करत निशाणा साधला आहे.

KRRK ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले, “नुसरत भरुचा शनिवारीच भारतात परतली होती . मात्र रविवारी सकाळी त्यांनी इस्राइलशी संपर्क तुटल्याची बातमी प्रसारित केली. एक तासानंतर त्यांनी माहिती दिली की ती सुरक्षित आहे आणि विमानात बसण्यासाठी विमानतळावर पोहोचली आहे. लगेच तासाभरानंतर तिने एक व्हिडीओ शेयर केला की ती मुंबईला पोहोचली आहे. आता ती किती मोठी नाटकी आणि निर्लज्ज आहे. याची तुम्ही कल्पना करू शकता."

Nushrratt Bharuccha back to India Israel Hamas
Israel Palestine Conflict: 'ती लोक ढोंगी..' स्वरानं इस्त्राइलवर हल्ला करणाऱ्या पॅलेस्टाईनचे केलं समर्थन

अशा शब्दात केआरकेनं नुसरतवर टीका केली आणि तिने हे सर्व नाटक केल्याचं सांगितले. कमाल आर खान सोशल मीडियावर अनेकदा बॉलिवूड सेलिब्रिटींना टार्गेट करत असतो. आता त्याने नुसरतवर टीका केली. सध्या त्याचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तर दुसरीकडे नुसरत इस्रायलमधून भारतात सुखरूप पोहोचल्याचे बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ती एअरपोर्टमधून बाहेर पडताना दिसत आहे. यावेळी ती खुपच घाबरलेली दिसली. 'मी सध्या खूप अस्वस्थ आहे, मला घरी जाऊ द्या.' अशी प्रतिक्रिया नुसरतने दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com