Meena Deshmukh: लावणी नृत्यांगना मीना देशमुख कालवश, अपघातात मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Meena Deshmukh

Meena Deshmukh: लावणी नृत्यांगना मीना देशमुख कालवश, अपघातात मृत्यू

पुणे - प्रसिद्ध लावणी नृत्यांगना मीना देशमुख यांचे अपघाती निधन झाल्याची बातमी आता समोर आली आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या वाहनाला अपघात होऊन ती कार ५० फुट खोल कालव्यात पडल्याचे दिसून आले. त्या अपघातात त्यांचा मृत्यु झाल्याची माहिती समोर आली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंढरपूरजवळ हा अपघात घडला. त्यामध्ये मीना यांच्यासह आणखी तीन जण जखमी झाले आहेत. मोडलिंब ते पंढरपूरकडे जाताना फॉर्च्युनर कार ५० फूट खोल कालव्यात पडली. त्यात देशमुख यांचा मृत्यु झाला आहे. या अपघातात त्यांची मुलगी, नात आणि चालक गंभीर जखमी झालेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीनं घटनास्थळी मदतकार्य सुरू केले. रुग्णवाहिका बोलावून जखमींना रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा - काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली?

हेही वाचा: Viral Video: प्रभास आणि क्रिती सननचं नातं कन्फर्म; वरुण धवननं दिली मोठी हिंट, म्हणाला...

एकीकडे पंढरपूर कुर्डूवाडी रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. अशावेळी पाटबंधारे विभागाच्या दिरंगाईमुळे पुलाबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्याचा फटका नागरिकांना बसताना दिसत आहे. ज्या कालव्यात गाडी पडली त्या कालव्यात उतरायला जागा नसल्यानं बचाव कार्यात अडथळे आले होते.

हेही वाचा: Video : नट, बोल्ट अन् पाना; गॅरेजमध्ये चक्क माकड बनला मेकॅनिक