भन्साळींच्या चित्रपटातील मोदी साकारणारा हा हिरो आहे तरी कोण ?

वृत्तसंस्था
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

'मन बैरागी' नावाचा चित्रपट मोदींच्या जीवनातील माहित नसलेल्या पैलूंवर आधारीत  आहे. आता मात्र सर्वत्र चर्चा आहे ती पोस्टरमधल्या अभिनेत्याची! 

मुंबई : विवेक ऑबेरॉयने मोदिंची भूमिका केलेला चित्रपट आल्यानंतर आता प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हेदेखील मोदिंचा बायोपिक तयार करत आहेत. त्याचा पहिला पोस्टर पतंपधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाला म्हणजे 17 सप्टेंबरला प्रदर्शित करण्यात आला. 'मन बैरागी' नावाचा हा चित्रपट मोदींच्या जीवनातील माहित नसलेल्या पैलूंवर आधारीत आहे. आता मात्र सर्वत्र चर्चा आहे ती पोस्टरमधल्या अभिनेत्याची! 

पोस्टरवर दिसणारा चेहरा नक्की कोणाचा आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. हा चेहरा आहे अभिनेता अभय वर्माचा. किशोरावस्थेत भूमिका साकारण्याची संधी मिळालेला अभय याआधी अनेक जाहिरातींमधून झळकला आहे. लोकप्रिय असणारी कॅडबरी डेरी मिल्कच्या एका जाहिरातीमध्ये तो दिसला होता. याशिवाय त्याने 'नैना दा क्या कसूर' या गाण्यातदेखील काम केलं आहे. 

'मन बैरागी' हा चित्रपट केवळ एक तासाचा असून यामध्ये मोदींच्या जीवनातील अनेक न पाहिलेले क्षण पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या पोस्टरवर मन बैरागी जब मुझसे मिला अशी टॅगलाईन पाहायला मिळत आहे. चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण हा सिनेमा हिवाळ्यापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येईल असं पोस्टरवर दिसत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meet Haryana youth who plays PM Modi in Bhansali s Mann Bairagi