"मेरी प्यारी बिंदू'ची पहिली झलक 

वृत्तसंस्था
शनिवार, 1 एप्रिल 2017

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि अभिनेता आयुषमान खुराना यांचा आगामी चित्रपट "मेरी प्यारी बिंदू'चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा टीझर रसिकांना खूप भावला असून, सध्या त्याची सगळीकडे चर्चा रंगली आहे. यात आयुषमान लेखकाच्या भूमिकेत; तर परिणीती गायिकेच्या रोलमध्ये दिसणार आहे. टीझर पाहून ही क्‍यूट लव्ह स्टोरी असेल असे वाटतेय. यातील परिणीतीने गायलेल्या गाण्यालाही दाद मिळतेय. या चित्रपटातून अक्षय रॉय दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. या चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्म्स करत आहे. हा चित्रपट 12 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: meri pyari bindu first trailor