Merry Christmas: शाहरुखच्या 'डंकी'ला सगळेच घाबरले की काय? आता विजय सेतुपति अन् कतरिनाच्या 'मेरी ख्रिसमस'ची रिलीज डेट बदलली!

बॉलीवूडचा किंग खान शाहरुखसाठी यंदाचे वर्ष चांगलेच लाभदायी ठरताना दिसत आहे.
Merry Christmas movie released date changed
Merry Christmas movie released date changed esakal

Merry Christmas movie released date changed : बॉलीवूडचा किंग खान शाहरुखसाठी यंदाचे वर्ष चांगलेच लाभदायी ठरताना दिसत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला त्याचा पठाण नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानं बॉक्स ऑफिसवर एक हजार कोटींची कमाई केली होती. त्यानंतर प्रदर्शित झालेल्या जवाननं विक्रमी कमाई केली आहे. अशात त्याचा डंकी नावाचा चित्रपट डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात प्रदर्शित होतो आहे. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)

यासगळ्यात डिसेंबरमध्ये जे चित्रपट प्रदर्शित होणार आहे त्यांच्या पुढे शाहरुखच्या डंकीचे आव्हान असणार आहे. त्यात प्रभासचा सालार आहे. करण जोहरचा योद्धा आहे. तसेच रणबीर कपूरचा अॅनिमल हा बहुचर्चित चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. मात्र विजय सेतुपति आणि कतरिना कैफचा मेरी ख्रिसमस नावाचा चित्रपटही डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Also Read - Male Andropause: काय सांगता पुरुषांनाही येते रजोनिवृत्ती?

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेरी ख्रिसमसच्या निर्मात्यांनी त्याची रिलीज डेट बदलली आहे. अगोदर हा चित्रपट २३ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. आता तो ०८ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी अनेक चित्रपटांनी आपले प्रदर्शन पुढे ढकल्याचे दिसून आले आहे. याबाबत इंडिया टुडेनं सविस्तर वृत्त दिले आहे. डिसेंबर १५ रोजी सिद्धार्थ मल्होत्राचा योद्धा नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यात मेरी ख्रिसमसची रिलीज डेट बदलल्यानं वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

शाहरुखच्या चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता मेकर्सकडून अशाप्रकारे तारखा बदलण्याचे प्रकार होत आहेत का अशा प्रतिक्रिया नेटकरी सोशल मीडियावरुन देऊ लागले आहेत. सलमान खानचा टायगर ३ हा दिवाळीत प्रदर्शित होत आहे. त्यामुळे या दरम्यान फारसे चित्रपट प्रदर्शनाच्या यादीत नाहीत. यानंतर मात्र मोठ्या प्रमाणात बॉलीवूडपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी तयार राहणार आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी दिग्दर्शित केलेला मेरी ख्रिसमस या गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय आहे.

Merry Christmas movie released date changed
Nana Patekar : नाना पाटेकरांच्या घरी ऋषी कपूर दारुची बाटली घेऊन गेले होते तेव्हा....! काय होता तो भन्नाट किस्सा?

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी केलेल्या पोस्टनंतर आता ही माहिती समोर आली आहे. त्यांनी त्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मेरी ख्रिसमसची नवीन रिलीज डेट जाहीर झाली आहे. हा चित्रपट आता येत्या ८ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Merry Christmas movie released date changed
Dunki Controversy : साऊथच्या कोणत्या चित्रपटाचा रिमेक आहे 'डंकी'? शाहरुखच्या नव्या चित्रपटावरुन वादाला सुरुवात!

मेरी ख्रिसमसविषयी आणखी बोलायचे झाल्यास हा हिंदी आणि तमिळ या दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणारा चित्रपट आहे. त्यात विजय सेतुपति आणि कतरिना कैफ पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेयर करताना दिसणार आहेत. तसेच कतरिना ही श्रीराम राघवन या दिग्दर्शकाच्या चित्रपटात पहिल्यांदाच झळकणार आहे. राघवन यांच्या यापूर्वीच्या अंधाधून आणि बदलापूर या चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com