जोपर्यत पैसे मिळणार तोवर टिवटिव करणार; मिया,अमांडानं सुनावलं

mia Khalifa Amanda Cerny make fun of trolls farmers protest see tweets
mia Khalifa Amanda Cerny make fun of trolls farmers protest see tweets

मुंबई - दिल्लीत चाललेल्या शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया देऊन शेतक-यांना समर्थन देणा-या काही सेलिब्रेटींवर टीका होत आहे. त्यात अमेरिकन गायिका रिहाना, मॉडेल व अभिनेत्री अमांडा. मिया खलिफा यांचा समावेश आहे. तसेच पर्यावरणप्रेमी ग्रेटा थनबर्गनंही शेतक-यांच्या बाजूनं मत व्यक्त केलं आहे. यावर जागतिक पातळीवरुन शेतकरी आंदोलनाला मिळणारा पाठींबा यामुळे देशातील सेलिब्रेटींनी मते मांडण्यास सुरुवात करुन परदेशी सेलिब्रेटींना धारेवर धरण्यास सुरुवात केली होती. यात नेटक-यांनीही जोरदार टीका केली.

शेतकरी आंदोलनावर आपली भूमिका स्पष्ट करणा-या मिया खलिफा आणि अमांडा सर्नी यांना ट्रोलर्सनं ट्रोल करण्यास सुरुवात केली  आहे. त्यांची मोठ्या प्रमाणात टर उडवली जात आहे. आता या दोघींनी ट्रोलर्सला चांगले झापले आहे. त्यावर अमांडानं व्टिट केलं असून त्यात आपण पैसे घेऊन व्टिट केल्याचे सांगितले आहे. शेतकरी आंदोलन सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्यावर दिलेल्या प्रतिक्रियेवर अमांडा, रिहाना आणि मिया ट्रोल व्हायला सुरुवात झाली आहे. ज्यावेळी त्यांना नेटक-यांनी ट्रोल केले तेव्हा मात्र खलिफा आणि रिहाना यांनी आपण शेतकरी आंदोलनासाठी पैसे घेतले आहेत असे सांगितले आहे. मात्र तरीदेखील त्यांनी आपले समर्थन तसेच ठेवले आहे.

अमांडानं सोशल मीडियावर असे सांगितले आहे की, मला त्रास देण्यासाठी अनेकजण ट्रोल करुन त्रास देत आहेत. माझेही काही प्रश्न आहेत. मला कोण पैसे देत आहे, मला किती पैसे मिळत आहेत, मी माझी मागणी कुणाकडे करु, मला पैसे केव्हा मिळणार अशा प्रकारच्या कमेंट मला येत आहे. त्यामुळे अखेर मला आणखी किती पैसे मिळणार असे सांगावे लागत आहे.

तसेच मियानंही नेटक-यांना झापले आहे. ती म्हणाली, आम्हाला जोपर्यत पैसे मिळत नाही तोपर्यत आम्ही टिवटिव काही थांबवणार नाही. त्यावर अन्य काही सेलिब्रेटींनीही प्रतिक्रिया दिली आहे. मियानं तर पेमेंटचा एक स्क्रिनशॉटही शेयर केला आहे. 
 

 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com