मुंबईहून दरभंगा इथे पोहोचलेल्या स्थलांतरित महिलेला झाला मुलगा, मुलाचं नाव ठेवलं सोनू सूद

sonu sood
sonu sood

मुंबई- कोरोना व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. या कठीण काळात आपापल्या गावी परत जाणा-या स्थलांतरित लोकांच्या संख्या वाढत चालली आहे. या लोकांसाठी सध्या देवासारखा धावून आलाय तो म्हणजे अभिनेता सोनू सूद. गेल्या अनेक दिवसांपासून सोनू सूद स्वतः रस्त्यावर उतरुन या स्थलांतरित लोकांना त्यांच्या गावी पोहचवण्यासाठी बसेसची व्यवस्था करतोय. या कामासाठी त्याने दिवस-रात्र स्वतःला वाहून घेतलं आहे. सोनूने ज्या लोकांना आत्तापर्यंत त्यांच्या घरी पाठवलं आहे त्यात एका गर्भवती महिलेचा समावेश होता. नुकताच तिने एका गोड बाळाला जन्म दिला आहे. आणि विशेष म्हणजे या मुलाचं नाव तिने सोनू सूद ठेवलं आहे.

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्यांसाठी अभिनेता सोनू सदू देवदूत बनला आहे. नुकत्याच एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत त्याने एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. सोनूने
सांगितलं की त्याने १२ मे ला काही लोकांचा एक ग्रुप दरभंगा इथे पाठवला होता. या ग्रुपमध्ये दोन गर्भवती महिलांचा समावेश होता. या ग्रुपमधील सर्वजण सुखरुप घरी पोहोचले. यातील एका गर्भवती महिलेने मुलाला जन्म दिला.

त्या कुटुंबाने सोनूला फोन करुन सांगितलं की त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव सोनू सूद ठेवलं आहे. जेव्हा सोनूने त्यांना विचारलं सोनू सूद कसं काय? सोनू श्रीवास्तव असं पाहिजे ना? त्यावर त्या महिलेने सांगितलं की नाही आम्ही मुलाचं नाव सोनू सूद श्रीवास्तव असं ठेवलं आहे. सोनूने सांगितलं की हे ऐकून तो भारावून गेला. 

इतकंच नाही तर जेव्हा सोनूला हे काम करण्यासाठी तुझा दिवस लवकर सुरु होत असेल ना ? असं विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला आम्ही झोपतोच कुठे? मी कधी कधी ४ वाजेपर्यंत जागा असतो. कधी कधी तर सकाळी ६ पर्यंत लोकांना उत्तर देत असतो.

सोनूने सांगितल्याप्रमाणे त्याला संपूर्ण देशातून दिवसभरात जवळपास ५६ हजार मेसेज येत असतात आणि लोक दिवसभर फोन करत असतात. मात्र हे खरंच आव्हानात्मक आहे पण मदत करणं हे देखील समाधान देणारं आहे.    

migrant worker named her son after sonu sood

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com