esakal | 'माझ्यावरील गाणं रिलीज तर कर, मग तुला सांगतो'....
sakal

बोलून बातमी शोधा

Mika singh news

'माझ्यावरील गाणं रिलीज तर कर, मग तुला सांगतो'....

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडच्या भाईजान सलमान खानवर (bollywood bhaijan salman khan) टीका करणा-या कमाल राशिद खानची (kamal rashid khan) सध्या मोठ्य़ा प्रमाणावर चर्चा आहे. त्यानं सलमानच्या राधे चित्रपटाचा (review of radhe your most wanted bhai) रिव्ह्यु केला होता. तो रिवह्यु सलमानच्या जिव्हारी लागला. त्यानं केआरकेनं आपला अपमान केल्यावरुन कोर्टात त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. दुसरीकडे याप्रकरणावरुन केआरकेनं गेल्या काही दिवसांपासून सोशल वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट शेअर करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रसिध्द गायक मिका सिंगनं त्याच्यावर एक गाणं तयार केलं होतं. ते चर्चेत आलं आहे. (mika singh shares glimpse of krk kutta song krk says tu ek baar release kar fir dekh)

मिका सिंगनं (mika singh) सांगितलं होतं की, मला माझ्या काही मित्रांनी असं सुचवलं होतं, आपण या गाण्याची निर्मिती करावी. त्यामुळे मी हे गाणं तयार केलं आहे. ते गाणं कोणीही आपल्या मित्रासाठी टॅग करु शकते. त्याच्या या गाण्याच्या टीझरला प्रेक्षकांची मोठ्य़ा प्रमाणात प्रसिध्दी मिळाली होती. अनेकांनी त्या गाण्याला आपली पसंतीही दर्शवली आहे. त्यावर आता केआरकेनं (krk) मिका सिंगला ते गाणं प्रसिध्द केल्यास काही खैर नाही अशा शब्दांत धमकी दिल्याचे समोर आले आहे.

केआरकेनं काही दिवसांपूर्वी मिका सिंगवर टीका करताना असं म्हटलं होतं, मी आता एका किडमि़ड्या गायकाचाही रिव्ह्यु करणार आहे. जो नाकातून गाणं म्हणतो. त्याला मिका सिंगनं जशास तसे उत्तर दिले आहे. मिका सिंगनं ज्यावेळी त्या गाण्याचा टीझर शेअर केला होता तेव्हा त्यानं चाहत्यांना विचारले होते की, त्यांना हे गाणे कसे वाटले, या गाण्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, मिका वर बसला आहे, त्याच्या पायाशी एक कुत्रेही आहे. त्या श्वानाच्या चेह-याच्या जागी मिकानं केआकरेचं चित्र लावले होते. त्यामुळे त्याच्या त्या पोस्टची चर्चा झाली आहे.

हेही वाचा: पर्ल पुरी प्रकरण: पीडित मुलीनेच घेतलं अभिनेत्याचं नाव- वकील

हेही वाचा: 'बलात्कार प्रकरणी पर्ल निर्दोष'; पीडितेच्या आईने घेतली अभिनेत्याची बाजू

केआरकेनं आपल्या सोशल मीडियावरुन लिहिलं आहे, तु इतकं का भुंकतो का आहेस, तुझी गाणे प्रदर्शित करण्याची लायकी आहे का, असेल तर घाबरु नकोस. ते बिनधास्तपणे रिलिज कर. मला असे वाटते की, तु ते एकदा रिलिज करावे. मग बघ. अशाप्रकारे दोघांमध्ये चांगलीच जुंपली आहे.