esakal | सुशांतला वाईट अभिनेता म्हणणा-या केआरकेची दिग्दर्शक मिलाप जवेरी यांनी केली पोलखोल
sakal

बोलून बातमी शोधा

krk milap zaveri

दिग्दर्शक मिलाप जवेरी यांनी सोशल मिडियावर एक पोल खोल करणारा व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये सुशांतबद्दल दोन वेगवेगळ्या प्रकारचं मत देताना दिसून आला आहे कमाल आर खान.

सुशांतला वाईट अभिनेता म्हणणा-या केआरकेची दिग्दर्शक मिलाप जवेरी यांनी केली पोलखोल

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई- अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर जिथे देशभरात त्याचे चाहते सोशल मिडियावर दुःख व्यक्त करत आहेत तिथे दुसरीकडे मात्र काही जण याचा फायदा स्वतःच्या प्रसिद्धीसाठी करत आहेत. यात कित्येकजण कालपर्यंत सुशांतबद्दल वाईट बोलत होते आणि आज अचानक त्यांना सुशांतबद्दस प्रेम वाटू लागलं आहे अशा व्यक्तिंचा देखील समावेश आहे. दिग्दर्शक मिलाप जवेरी यांनी सोशल मिडियावर असाच एक पोल खोल करणारा व्हिडिओ  सोशल मिडियावर पोस्ट केला आहे ज्यामध्ये सुशांतबद्दल दोन वेगवेगळ्या प्रकारचं मत देताना दिसून आला आहे कमाल आर खान.

हे ही वाचा: गलवान वॅलीमध्ये शहीद झालेल्या २० जवानांवर अजय देवगण बनवणार सिनेमा

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पहिले कमाल खान सांगत आहे की, सुशांतला अभिनय येत नाही. माझ्या मते एकता कपूरवर खूप जास्त दंड आकारला पाहिजे की तीने त्याला अभिनेता बनवलं. एवढंच नाही तर साजीद नाडियादवाला सारख्या निर्मात्यांवर देखील दंड आकारला पाहिजे जे त्याला ८ कोटी रुपये देतात. जेव्हा तुम्ही एका ८ लाखाची क्षमता असलेल्या अभिनेत्याला ८ कोटी रुपये देता....

यासोबतंच केआरेची एक ताजी प्रतिक्रिया आहे ज्यामध्ये तो सुशांतच्या निधनानंतर त्याच्या स्तुतीचा पाढाच वाचत आहे. हा व्हिडिओ पाहून केवळ चाहत्यांनाच नाही तर इंडस्ट्रीमधील अनेकांना राग अनावर झाला आहे. सिनेनिर्माते मिलाप जवेरी यांनी एक पोस्ट शेअर करत या व्हिडिओवर राग व्यक्त केला आहे आणि म्हटलं आहे की सुशांतच्या या दुःखी वातावरणात केआरके खोटे अश्रु गाळत आहे. मिलाप यांनी लिहिलं आहे की, ही तीच व्यक्ती आहे ज्याने सुशांत जीवंत असताना त्याच्याबद्दल अशा गोष्टी बोलून त्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला होता.

यासोबतंच केआरकेचं हे दुतोंडी वागणं पाहून त्यांनी लिहिलं आहे की, अशा लोकांना आता आवर घालण्याची वेळ आली आहे.  

milap zaveri reacts to krk old video in which he trashing sushant and now his fake tears for actor  

loading image