Milind Gawali: आधी बाबा गेले आणि आता आईचं निधन.. मिलिंद गवळी यांची मनाला चटका लावून जाणारी पोस्ट

मिलिंद गवळी त्यांच्या फिटनेसबद्दल प्रचंड जागरूक असलेल्या अभिनेते आहेत
milind gawali, aai kuthe kay karte, milind gawali news
milind gawali, aai kuthe kay karte, milind gawali newsSAKAL

Milind Gawali News: 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतील मिलिंद गवळी साकारत असलेल्या अनिरुद्ध या भूमिकेला खलनायक असुनही प्रचंड प्रेम मिळत आहे.

मिलिंद गवळी त्यांच्या फिटनेसबद्दल प्रचंड जागरूक असलेल्या अभिनेते आहेत. मिलिंद गवळी कायमच मालिकेतील सहकलाकार आणि तंत्रज्ञांबद्दल कायमच पोस्ट करत असतात.

(milind gawali from aai kuthe kay karte very emotional post about the writer of serial)

milind gawali, aai kuthe kay karte, milind gawali news
Maharashtrachi Hasyajatra फेम गौरव मोरे सोबत सुजय विखे पाटलांचा शिर्डीतील भन्नाट डान्सचा Video बघाच

मिलिंद गवळी यांनी नुकतीच एक पोस्ट केलीय. या पोस्टमध्ये मिलिंद गवळी लिहितात.."खऱ्या आयुष्यामध्ये जे आपण डोळ्यांनी बघतो ते नेहमीच तेच खरं असतं असं नाहीये, जे आपल्याला दिसतं त्याच्यामागे खूपशा गोष्टी दडलेल्या, ज्या आपल्यासमोर कधीच येत नाहीत,

आपण जे डोळ्यांनी जे पाहतो तेवडच आपल्या ला दिसत असतं, खूपशा गोष्टी behind the scene असतात आणि खूप काही between the lines ही असतं.

जे कधीच नाही दिसत, आणि या सिनेमा नाटक सिरीयल या क्षेत्रामध्ये तर सगळंच behind the scene नच असतं,

milind gawali, aai kuthe kay karte, milind gawali news
Sari Movie: ती त्याला आवडते पण तिला तो ...? प्रेमाच्या त्रिकुटाची उत्कट कहाणी 'सरी'चा टीझर प्रदर्शित

मिलिंद पुढे लिहितात.. "सिरीयल चा 23 - 24 मिनिटाचा एपिसोड साठी कित्येक दिवस बरीचशी मंडळी बरच काही करत असतात , पडद्याच्या मागे खूप काही घडत असतं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपल्याला दिसत नाही, दिसत नाही तो लेखक,

जो रात्रंदिवस तो डोकंफोडी करत असतो, आता लोकांना काय आवडेल, कुठल्या कलाकाराचा ट्रॅक लोकांना आवडतोय,

तो लिहिल्यानंतर कळतं की कलाकाराकडे dates available नाहीयेत, तो कलाकार आजारीच पडला आहे, मग परत लेखक डोकेफोडी करतो, परत पुन्हा सगळं लिहून काढतो.

milind gawali, aai kuthe kay karte, milind gawali news
Prasad Khandekar: प्रसादला मिळाला 'नाट्यगौरव' पुरस्कार, पण त्याला आनंद वेगळ्याच गोष्टीचा... जाणुन घ्या

मिलिंद गवळी पुढे मालिकेच्या लेखिका नमिता वर्तक यांच्या आयुष्यात आलेल्या दुःखद प्रसंगाबद्दल गोष्ट सांगतात.. लेखकाचं जर सगळं सुरळीत चाललं असेल तर तो हे पण सगळं आनंदाने करतो, पण जर लेखकाच्याच आयुष्यात खूप काही घडत असेल,

उलथा पालत होत असेल तर, “आई कुठे काय करते “ च्या लेखिका नमिता वर्तक हिचे वडील प्रसिद्ध समीक्षक कमलाकर नाडकर्णी बरेच महिने आजारी होते, त्यांची सगळी सुश्रुषा करत करत दवाखान्यात सुद्धा नमिताने “आई कुठे काय करते” चे एपिसोड लिहून दिले,

मिलिंद गवळी शेवटी सांगतात.. 11 मार्चला रात्री दहा वाजता नाडकर्णी काकां गेले, त्या दुःखात सुद्धा “ आई कुठे काय करते “ चे एपिसोड नमिताने लिहून देत होती, काल 27 मार्च रोजी म्हणजे 16 दिवसांनी आजारपणामुळे नमिताची आई गेली,

नमिताच्या दुःखाची कल्पनाच करवत नाही, आभाळा एवढं दुःख हेच असतं बहुतेक. हे behind the scenes जे कधी येत नाही प्रेक्षकांसमोर.. हे सगळं सहन करायची तिला शक्ती मिळू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना."

अशी पोस्ट मिलिंद गवळी यांनी लिहिली आहे. आई कुठे काय करते हि मालिका सोमवार ते शनिवार रात्री ७.३० ला प्रेक्षकांना स्टार प्रवाहवर पाहायला मिळतेय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com