Video: 'प्रेम कुठंही करता येतं! 100 फुट खोल समुद्रात मिलिंद सोमणचा 'रोमान्स' |Milind Soman Ankita Egypt Vacation underwater | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Milind Soman News

Video: 'प्रेम कुठंही करता येतं! 100 फुट खोल समुद्रात मिलिंद सोमणचा 'रोमान्स'

Milind Soman Ankita Egypt Vacation: अभिनेता मिलिंद सोमण हा नेहमीच त्याच्या हटकेपणासाठी ओळखला जाणारा सेलिब्रेटी आहे. त्यानं आपल्या वयापेक्षा अर्ध्या वयाच्या अंकिताशी लग्न केलं होतं. त्यामुळे तो सोशल )(social media viral news) मीडियावर चर्चेत आला होता. काही वर्षांपूर्वी मिलिंद हा गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावरुन नग्नावस्थेत धावला होता. त्यामुळे देखील त्याच्यावर टीका झाली होती. तो भारतातील सर्वाधिक लोकप्रिय फिटनेस फ्रिक (bollywood fitness freak) आहे. त्यामुळे अजुनही तरुणाईचा आयडल म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अंकिता (Milind Ankita Egypt Vacation)

आता मिलिंद चर्चेत आला आहे त्याचे कारण त्यानं समुद्रात शंभर फुट खाली केलेला रोमान्स. हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे मिलिंदवर (milind and ankita) एकीकडे कौतूकाचा वर्षाव होतोय तर दुसरीकडे त्याच्यावर सडकून टीकाही केली जात आहे. मिलिंदनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यामध्ये तो पत्नी अंकितासोबत रोमँटिक मुडमध्ये असल्याचे दिसून आले आहे. त्या व्हिडिओवर मिलिंदच्या चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी त्याला नेहमीप्रमाणे ट्रोल केले आहे.

अंकिता कुवर आणि मिलिंदची जोडी सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. दोघेही नेहमीच फिटनेसला महत्व देत असतात. त्यांच्या व्हायरल झालेल्या यापूर्वीच्या व्हिडिओला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. मिलिंदचा अंडरवॉटर रोमान्स हा त्याच्या चाहत्यांना सुखावणारा ठरला आहे. फॅमिलीसोबत क्वालिटी टाईम त्यांनी स्पेंड केला आहे. दोन्ही सेलिब्रेटींच्या चाहत्यांनी त्यावर आनंद व्यक्त केला आहे.

हेही वाचा: Video : विजयची हाणामारी! डीकेचं भूत काही मानगुटीवरून उतरत नाही

मिलिंद आणि अंकिताच्या अंडर वॉटर रोमान्सचा तो व्हिडिओ चाहत्यांना भलताच आवडला आहे. त्या दोघांनी अंडर वॉटर स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेतला आहे. तो व्हिडिओ शेयर करताना मिलिंदनं लिहिलं आहे की, जास्तीत जास्त अनुभव घेणे, जास्त फिरणे, आनंद घेणे. मिलिंदनं शंभर फुट पाण्याखाली हार्टचा इमोजी बनवला आहे. त्याला चाहत्यांनी प्रतिसाद दिल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी देखील अंकिता आणि मिलिंदचे अंडर वॉटर फोटो सोशल मीडीयावर व्हायरल झाले असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

हेही वाचा: Video: दगडूच्या प्रेमाला पुन्हा फुटणार 'पालवी'

Web Title: Milind Soman Ankita Egypt Vacation Underwater Romance With Wife Video Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..