esakal | मिलिंदचा शर्टलेस लूक पाहून मलायका म्हणाली, मला तर...
sakal

बोलून बातमी शोधा

मिलिंदचा शर्टलेस लूक पाहून मलायका म्हणाली, मला तर...

मिलिंदचा शर्टलेस लूक पाहून मलायका म्हणाली, मला तर...

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडचा सर्वात लोकप्रिय मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण (Milind Soman) हा त्याच्या फिटनेस फ्रीकसाठी ओळखला जातो. वयाची 55 वर्षे पूर्ण केलेल्या या अभिनेत्यावर अजूनही अनेक तरुणी फिदा आहेत. त्याचे कारण त्याचा फिटनेस आणि लूक. गेल्या काही वर्षांपासून तो बॉलीवूडपासून लांब होता. मात्र अलीकडच्या काळात तो मालिका आणि चित्रपटांमध्ये दिसून आला आहे. सध्या सोशल मीडियावर त्याची हवा आहे. तो जे लूक करतो त्याचे फोटो पोस्ट करतो त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो. मिलिंदच्या प्रत्येक पोस्टला चाहते भरभरून प्रतिसाद देतात. आताही त्याचा एक व्हि़डिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर अभिनेत्री मलायकानं जी प्रतिक्रिया दिलीय त्यामुळे ती चर्चेत आली आहे. तिनं मिलिंदला त्या लूकमध्ये पाहिलं आणि तिच्या तोंडून निघालं ते वाक्य. त्यामुळे मलायकाही चर्चेत आली आहे.

सुपर मॉडेल ऑफ द इयरच्या एका इपिसोडमध्ये मलायका जज मिलिंद सोमण सोबत दिसली. यावेळी मिलिंदनं फारच मोकळ्यापणानं गप्पा मारल्या. तो म्हणाला, मला लाऊड स्वभावाच्या महिला फार आवडतात. त्या महिलांकडे माझे लक्ष अधिक जाते. त्यावर मलायका म्हणाली, यावर माझं मत उलटं आहे. मला अशी मुलं आवडतात जी रफ अँड टफ प्रकारची आहे. सुंदर चेहरा असणं हे माझ्या लेखी सुंदर असण्याचं लक्षण नाही. मला फार मॅचो लूकवाले हिरोही आवडत नाही. मलायकाच्या त्या वक्तव्यानं सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

loading image
go to top