
गोव्यातील समुद्रकिनारी मिलिंदला बोल्ड फोटोशुट करणे चांगलेच महागात पडले आहे. या फोटोवरुन त्याच्या चाहत्यांकडून त्याला लाईक्स मिळाले आहेत. आता त्याला सपोर्ट करण्यात त्याची पत्नी अंकिता समोर आली आहे.
मुंबई - मिलिंदच्या बोल्ड फोटो प्रकरणाने वेगळे वळण घेण्यास सुरुवात केली आहे. त्याच्यावर गोव्यातील एका पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. सध्या अभिनेत्री पुनम पांडे आणि मिलिंद सोमण हे त्यांच्या बोल्ड फोटो शुट प्रकरणी चर्चेत आले आहेत. आता त्यात मिलिंदच्या बायकोने उडी घेतली आहे. तिने एक फोटो शेयर करुन या प्रकरणाला फोडणी दिली आहे.
गोव्यातील समुद्रकिनारी मिलिंदला बोल्ड फोटोशुट करणे चांगलेच महागात पडले आहे. या फोटोवरुन त्याच्या चाहत्यांकडून त्याला लाईक्स मिळाले आहेत. आता त्याला सपोर्ट करण्यात त्याची पत्नी अंकिता समोर आली आहे. तिने त्याचा एक शर्टलेस फोटो नुकताच शेयर केला आहे. सध्या मिलिंदवर त्याने त्य़ाच्या जन्मदिनाच्या दिवशी बोल्ड फोटोशुट करुन ते सोशल मीडियावर व्हायरल केले होते. यामुळे तो चर्चेत आला होता. त्याच्यावर वास्को पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला सपोर्ट करण्यासाठी अंकिताने पुढाकार घेतला आहे.
फिटनेस आणि बोल्ड पर्सेनॅलिटी यासाठी मिलिंदची एक वेगळी छाप माध्यमांमध्ये आहे. यासाठी तो त्याच्या चाहत्यांमध्येही कमालीचा लोकप्रिय आहे. तो सतत चर्चेत असणारा अभिनेता आहे. यासगळ्या पार्श्वभूमीवर मिलिंदची पत्नी अंकिता कोवरने शेयर केलेला फोटो त्याने केलेल्या कृतीच्या समर्थनार्थ असल्याची चर्चा नेटक-यांमध्ये रंगली आहे. मिलिंदच्या इंस्टाग्राच्या अकाऊंटवरील फोटो पाहिल्यास त्यातील डझनवारी फोटो हे शर्टलेस असल्याचे दिसून येते.
वास्को पोलीस ठाण्यात मिलिंदवर गुन्हा दाखल होणे त्यानंतर त्याच्या पत्नीने फोटो शेयर करणे यावरुन ते दोघेही नेटक-यांच्या चर्चेचा विषय ठरले आहेत. या फोटोविषयी लिहिताना अंकिता म्हणते, मला मिलिंदचा गर्व वाटतो. माझ्या व्हिटॅमिन ची तो डी गोळी आहे. अशाप्रकारच्या अंकिताच्या कमेंटमुळे तिला चाहत्यांकडूनही सपोर्ट मिळत असल्याचे दिसून आले आहे.
'मिलिंदचं वय वाढलं,त्याचा बालिशपणा काही गेला नाही'
मिलिंदच्या त्या बोल्ड फोटोशुट प्रकरणावर अभिनेता शेखर सुमन यांनी व्टिटवरुन प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यांनी शेलक्या शब्दांत मिलिंदच्या अशाप्रकारच्या कृतीवर बोट ठेवलं आहे. ते म्हणाले, “मिलिंदचं वय 55 झालं आहे पण त्याच्या कृती बालिशच आहेत. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
तनुश्री म्हणे,' नानांसारख्या व्यक्तिला निर्माते काम देतात कसे'?