तनुश्री म्हणे,' नानांसारख्या व्यक्तिला निर्माते काम देतात कसे'?

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 7 November 2020

प्रसिध्द अभिनेते नाना पाटेकर हे फिरोज नाडियाडवाला यांच्या आगामी वेब अभिनय करताना दिसणार आहेत. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र त्यांच्या या  कम बॅकवर अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने टीका केली आहे.

मुंबई - प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तन केल्याचा आरोप करणा-या तनुश्रीने पुन्हा एकदा खळबळजनक विधान करुन लक्ष वेधून घेतले आहे.  मागील वर्षी तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यावर आरोप करुन वेगळ्या चर्चेला तोंड फोडले होते. यामुळे मी टू चळवळीकडे विशेष लक्ष दिले गेले. आताही तनुश्रीने केलेलं विधान तिला वादाच्या भोव-यात ओढण्यासाठी पुरेसं आहे. 

प्रसिध्द अभिनेते नाना पाटेकर हे फिरोज नाडियाडवाला यांच्या आगामी वेब अभिनय करताना दिसणार आहेत. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र त्यांच्या या  कम बॅकवर अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने टीका केली आहे. नानांसारख्या व्यक्तीला निर्माते काम कसं देऊ शकतात? असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे. यासगळ्यात आपण अजून न्यायाच्या प्रतिक्षेत असल्याचे तनुश्रीने म्हटले आहे. 

शेवंताबाईंची गोष्टच वेगळी होती,पम्मीचं तसं नाहीये'

तनुश्री म्हणाली, “नाना पाटेकर यांनी मला प्रचंड मानसिक त्रास दिला. त्यांच्यामुळे माझं फिल्मी करिअर संपलं. काही वर्ष मी नैराश्येत देखील होते. स्त्रियांचा अनादर करणाऱ्या या व्यक्तीला बॉलिवूडमध्ये पुन्हा काम देऊ नये. निर्मात्यांनी नाना पाटेकर यांना पाठिंबा देऊ नये. ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी माझ्यासोबत लैंगिक गैरवर्तणुक केली होती, असा आरोप तनुश्री दत्ता हिने केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिलेल्या मुलाखतीत तनुश्रीने त्या प्रकरणाचा उल्लेख पुन्हा एका नाना पाटेकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 

अभिनयात बाप आहेच पण 'रोमान्स' करण्यातही 'कमल' ची बरोबरी नाही

या देशातील लोक सुशांतला न्याय मिळावा यासाठी प्रशासन व्यवस्थेशी लढले. परंतु मला मात्र कोणाचाही पाठिंबा मिळाला नाही. असे आरोप करत तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यावर टीका केली आहे. 
 

  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tanushree Dutta commented on Nana Patekar his Bollywood comeback