
मिलिंदच्या त्या बोल्ड फोटोशुट प्रकरणी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. दुसरीकडे त्याच्या अगोदर अभिनेत्री पुनम पांडेवरही सार्वजनिक ठिकाणी बोल्ड व्हिडीओ शुट केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई - गोव्याच्या समुद्रकिनारी जन्मदिनाच्या निमित्ताने एक बोल्ड फोटो काढून तो मिलिंदने सोशल मीडियावर शेयर केला. आता त्याच्यावरुन वादाला सुरुवात झाली आहे. त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मात्र बॉलीवूडमधल्या काही कलाकारांनी त्याच्यावर टीका केली आहे. प्रसिध्द अभिनेता व निवेदक शेखर सुमन यांनी त्याच्या अशा प्रकारच्या वागण्यावर परखड प्रतिक्रिया दिली आहे.
मिलिंदच्या त्या बोल्ड फोटोशुट प्रकरणी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. दुसरीकडे त्याच्या अगोदर अभिनेत्री पुनम पांडेवरही सार्वजनिक ठिकाणी बोल्ड व्हिडीओ शुट केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरुन सोशल मीडियामध्ये या दोघांनाही टीकेला सामोरं जावं लागलं आहे. या प्रकरणावर अभिनेता शेखर सुमन यांनी व्टिटवरुन प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यांनी शेलक्या शब्दांत मिलिंदच्या अशाप्रकारच्या कृतीवर बोट ठेवलं आहे. ते म्हणाले, “मिलिंदचं वय ५५ झालं आहे पण त्याच्या कृती बालिशच आहेत. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
Milind Soman...umra pachpan ki..harkatein bachpan ki.
— Shekhar Suman (@shekharsuman7) November 6, 2020
‘मिलिंद सोमणनं सोशल मीडियावर न्यूड फोटो अपलोड केल्यामुळे गोव्याच्या प्रतीमेचा आणि संस्कृतीचा अपमान झाला आहे,’ असं म्हणत गोवा सुरक्षा मंचानं वास्को पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. 4 नोव्हेंबर रोजी आपल्या 55 व्या वाढदिवसानिमित्त मिलिंद सोमणनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता.
तनुश्री म्हणे,' नानांसारख्या व्यक्तिला निर्माते काम देतात कसे'?
या अगोदर गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर बोल्ड व्हिडीओ शुट केल्याप्रकरणी पूनम पांडेला अटक करण्यात आली होती. दुसरीकडे समुद्र किनाऱ्यावर बोल्ड फोटोशूट केल्याप्रकरणी अभिनेता मिलिंद सोमणविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गोव्यातील वास्को पोलीस स्थानकात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याच्यावर आयटी कायद्याच्या आयपीसीच्या कलम 294 आणि सेक्शन 67 अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अजय देवगण आणि 'बिग बी' सात वर्षांनंतर एकत्र