'मिर्झापूर'फेम अभिनेत्यावर आली राम लड्डू विकण्याची वेळ?

राजेश तैलंग यांच्यावर खरंच आर्थिक संकट कोसळलं आहे?
'मिर्झापूर'फेम अभिनेत्यावर आली राम लड्डू विकण्याची वेळ?

गेल्या वर्षभरापासून थैमान घालणाऱ्या कोरोना (coronavirus) विषाणूची देशात सध्या दुसरी लाट आली आहे. त्यामुळे या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक ठिकाणी लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. परंतु, या लॉकडाउनचा कमी-अधिक परिणाम सर्वच क्षेत्रांवर झाला आहे. यात कलाविश्वदेखील अपवाद नाही. सध्याच्या काळात चित्रपट, मालिका या सगळ्यांचं चित्रीकरण ठप्प असल्यामुळे कलाविश्वातील अनेक जणांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामध्येच मिर्झापूर (Mirzapur) या गाजलेल्या वेब सीरिजमधील अभिनेता राजेश तैलंग याचा एक फोटो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या फोटोमध्ये राजेश राम लड्डू विकतांना दिसत आहेत. त्यामुळे कोरोना काळामुळे खरंच त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळलं आहे की काय असा प्रश्न चाहत्यांमध्ये निर्माण झाला आहे.(mirzapur-actor-rajesh-tailang-shared-photo-as-he-sales-ram-ladoo-see-viral-photo)

मिर्झापूर (Mirzapur) या लोकप्रिय वेब सीरिजमधील राजेश तैलंग यांनी नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ते राम लड्डू हा दिल्लीतील प्रसिद्ध पदार्थ विकतांना दिसत आहेत. हा फोटो शेअर करत त्यांनी, 'लॉकडाउन संपला, कोरोना गेला की परत कामाला लागूयात', असं कॅप्शन या फोटोला दिलं आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, राजेश तैलंग यांचा हा फोटो त्यांच्या आगामी प्रोजेक्टचा भाग असल्याचं म्हटलं जात आहे. तर, काहींच्या मते, लॉकडाउनमुळे त्यांच्यावर ही परिस्थिती ओढावली आहे. परंतु, नेमकं या फोटोमागील गुपित काय हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे. राजेश तैलंग यांनी मिर्झापूर या वेबसीरिजमध्ये अभिनेता अली फजलच्या वडिलांची भूमिका साकारली होती. त्यांच्या भूमिकेचं सर्व स्तरांमधून कौतुक करण्यात आलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com