'मिस युनिव्हर्स हरनाज' एवढ्या कोटींची मालकीण

एक दोन नव्हे तर तब्बल 21 वर्षानंतर भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
'मिस युनिव्हर्स हरनाज' एवढ्या कोटींची मालकीण

मुंबई - एक दोन नव्हे तर तब्बल 21 वर्षानंतर भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. तो म्हणजे भारताकडून हरनाज संधून( Miss Universe 2021 Harnaaz Sandhu Net Worth 2021) मिस युनिव्हर्सचा किताब मिळवला आहे. तिच्यावर सध्या कौतूकाचा वर्षाव सुरु आहे. सोशल मीडियातून चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. यानिमित्तानं हरनाजच्या व्यक्तिमत्व, तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित गोष्टींविषयीची माहिती समोर येण्यास सुरुवात झाली आहे. तिला जो हिरेजडित मुकूट घालण्यात आला त्याची किंमत 37 कोटी रुपये असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याशिवाय हरनाज कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

हरनाज आता लाईमलाईटमध्ये आली आहे. जगभरातील माध्यमांनी तिची दखल घेतली आहे. 21 वर्षांनी भारताच्या वाट्य़ाला हा मान मिळाला आहे. त्यामुळे तमाम भारतीयांना या गोष्टीचा प्रचंड आनंद झाला आहे. हरनाज संधू ही 70 वी मिस युनिव्हर्स ठरली आहे. ज्यावेळी हरनाजच्या डोक्यावर तो सोनेरी मुकूट ठेवण्यात आला त्यावेळी भारतीयांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केल्याचे दिसून आले आहे. चंदीगढ येथे राहणाऱ्या हरनाजनं पराग्वे आणि दक्षिण आफ्रिकेच्या स्पर्धकांना मात देऊन त्या मुकूटावर आपले नाव कोरले. तिला विचारण्यात आलेल्या पर्यावरणविषयक प्रश्नावर तिनं ज्यापद्धतीनं उत्तर दिलं त्याची सध्या चर्चा आहे. त्याचे परिक्षकांनी कौतूकही केले.

2000 मध्ये लारा दत्तानं मिस युनिव्हर्सचा किताब मिळवला होता. त्यानंतर हरनाजनं (Miss Universe 2021) ती कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारी ती तिसरी भारतीय आहे. हरनाजच्या संबंधित वेगवेगळ्या गोष्टींची सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु आहे. त्यामध्ये तिच्याकडे असलेल्या कोट्यवधी रुपयांचीही चर्चा आहे. मिस युनिव्हर्सपूर्वी हरनाज संधूच्या नावे अनेक खिताब आहेत. त्यामध्ये टाईम्स फ्रेश फेस मिस चंदीगढ, मिस मॅक्स इॅमेजिंग स्टार इंडिया, फेमिना मिस इंडिया पंजाब सारखे खिताब तिला मिळाले आहेत. याशिवाय तिनं यारा दिया पू बरन आणि बाई जी कुट्टंगे सारऱ्या पंजाबी चित्रपटांमध्ये तिनं काम केलं आहे.

'मिस युनिव्हर्स हरनाज' एवढ्या कोटींची मालकीण
Podcast: 21 वर्षांनंतर हरनाज संधू 'मिस युनिव्हर्स' ते दुबई जगातला पहिला पेपरलेस देश
'मिस युनिव्हर्स हरनाज' एवढ्या कोटींची मालकीण
हरनाज संधू म्हणाली,''बॉलीवूडची 'ही' अभिनेत्री माझं प्रेरणास्थान''
'मिस युनिव्हर्स हरनाज' एवढ्या कोटींची मालकीण
Miss Universe 2021: हरनाज संधूच्या सौंदर्यापुढे अभिनेत्रीही फिक्या

हरनाजची लाईफ स्टाईल देखील तितकीच अलिशान आहे. ती गेल्या काही काळापासून मॉडेलिंग क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संधू ही (Harnaaz Sandhu Net Worth) 38 कोटींची आहे. 2017 मध्ये तिची संपत्ती 1 मिलियन डॉलर एवढी होती. आता ती 5 मिलियन एवढी झाल्याची माहिती मिळाली आहे. मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकल्यानंतर तर तिच्या लाईफस्टाईलमध्ये आणखी बदल होणार आहे. यापूर्वी हरनाजनं चित्रपट आणि मॉडेलिंग मधून मोठ्या प्रमाणावर पैसे कमावले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com