यशराजच्या विनोदी चित्रपटात मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर

यशराजच्या विनोदी चित्रपटात मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर


मुंबई ः 2017 मध्ये मिस वर्ल्ड हा किताब जिंकून मानुषी छिल्लरने आपली वेगळी ओळख निर्माण केली. काही दिवसांपूर्वीच ती यशराज फिल्म्सच्या मेगा ऐतिहासिक चित्रपट पृथ्वीराजमध्ये अक्षय कुमारच्यासोबत मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. आता तिने आणखीन एक दुसरा मोठा चित्रपट साईन केला आहे. हा एक कॉमेडी चित्रपट असून या चित्रपटात ती विकी कौशलची नायिका म्हणून दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मानुषी आणि विकी पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. विकी आणि मानुषी ही एक अतिशय रंजक जोडी ठरेल तसेच ती बॉलिवूडमधील सर्वात लहान आणि फ्रेश रोमँटिक जोडींपैकी एक असेल.

विकीचा हा पहिला विनोदी चित्रपट आहे आणि मानुषीसुद्धा पहिल्यांदाच या शैलीत आपले नशीब आजमावणार आहे. या चित्रपटाची अधिकृत घोषणा 27 सप्टेंबर रोजी होणार आहे. निर्माता आदित्य चोप्रा करतील ही घोषणा करणार आहेत. त्याचबरोबर अन्य कलाकार कोण असतील याचीही माहिती मिळणारआहे. पृथ्वीराज या चित्रपटाचे चित्रीकरण आता लाॅकडाऊनमुळे रखडलेले आहे. तेदेखील लवकरच पूर्ण होईल अशी आशा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com