
एक नाही, दोन नाही तर केली तीन लग्न, 'हा' आहे मिथुन चक्रवर्तींचा भूतकाळ..
Mithun Chakraborty Birthday : बॉलिवूड चित्रपटसृष्टीत 'डिस्को डान्सर' म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांचा आज (16 जून) वाढदिवस. आज जरी मिथुनदा बॉलीवूडचे बादशाह असले तरी एकेकाळी त्यांनी फार हाल अपेष्टा सहन केल्या आहेत. बॉलीवुड मध्ये डिस्को डान्सर आणि प्रमुख अभिनेता म्हणून ख्याती होण्यामागे खूप मेहनत आहे. पण मिथुन यांचं वैवाहिक आयुष्यही फार सुखी राहिलेलं नाही. विश्वास बसणार नाही मिथुन चक्रवर्ती यांनी तब्बल तीन लग्न केली आहेत. यामध्ये एका मोठ्या अभिनेत्रीचाही समावेश आहे. (mithun chakraborty had 3 wife he was secretly married to sridevi )
हेही वाचा: लोकांच्या पार्टीत नाचून पोट भरायचे मिथुनदा, कसा होता त्यांचा स्ट्रगल..
मिथुनदा यांचे पहिले लग्न हेलेना ल्युक यांच्याशी झाले होते. हेलेना देखील अभिनेत्री होतया. 70 च्या दशकातील फॅशन आयकॉन म्हणून त्या ओळखल्या जायच्या. पण दुर्दैवाने हा विवाह टिकू शकला नाही. लग्नाच्या चार महिन्यांनंतरच मिथुन आणि हेलेना वेगळे झाले. मिथुन दाचे एकेकाळी हेलेना ल्यूकवर खूप प्रेम होते. पण त्यावेळी मिथुनचा चुलत भाऊ त्याच्यासोबत राहत होता. हेलेनाला ही गोष्ट आवडली नाही. यावरून मिथुन आणि हेलेना यांच्यात वाद झाले आणि पहिला संसार मोडला.
हेही वाचा: प्राजक्ता माळीचं झालं ब्रेकअप.. म्हणाली, मला तेव्हाचं काहीही..
पुढे हेलेना ल्यूकपासून वेगळे झाल्यानंतर मिथुन चक्रवर्तीने योगिता बालीसोबत दुसरे लग्न केले होते. योगिता बाली या किशोर कुमार यांच्या तिसऱ्या पत्नी. मिथुन यांच्याशी बाली यांचे प्रेमसंबंध असल्याने किशोर कुमार आणि बाली वेगळे झाले. पण पुढे त्यांच्याही नात्यात खटके उडू लागले आणि त्याचे कारण होते अभिनेत्री श्रीदेवी.
'प्यार झुकता नहीं' सारख्या चित्रपटानंतर मिथुन यांची ख्याती भलतीच वाढली. त्यावेळी अभिनेत्री श्रीदेवी देखील मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रेमात होत्या. मिथुन देखील श्रीदेवी यांच्या प्रेमात वेडे होते. दोघांनी गुपचूप लग्न केल्याचे बोलले जाते. एका पत्रकार परिषदेत त्यांनी हे मान्य देखील केले होते. पण त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. मिथुन आणि श्रीदेवी यांचे नाते पुढे जात असल्याचे लक्षात येताच योगिता बाली यांनी समज देऊन हे प्रकरण थांबवले. त्यामुळे मिथुन यांनी श्रीदेवीला पत्नीचा दर्जा दिला नाही.
Web Title: Mithun Chakraborty Had 3 Wife He Was Secretly Married To Sridevi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..