Mithun Chakraborty: आयला, चीनमध्ये मिथुनची क्रेझ! इथून, तिथून फक्त मिथून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mithun Chakraborty

Mithun Chakraborty: आयला, चीनमध्ये मिथुनची क्रेझ! इथून, तिथून फक्त मिथून

Mithun Chakraborty: बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता डिस्को डान्सर स्टार मिथुन चक्रवर्ती हा आता भारतात नाहीतर चक्क चीनमध्ये प्रसिद्ध झाला आहे. भारतात मिथुनची क्रेझ तर सर्वांना माहिती आहे, पण चीनमध्ये देखील त्याची हवा झाली आहे. त्याच्या डिस्को डान्सर या चित्रपटातील जिम्मी जिम्मी हे गाणे चीनमध्ये भलतेच हिट झाले आहे. ते एवढं लोकप्रिय होण्यामागील कारण मात्र गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

१९८९ मध्ये आलेल्या डिस्को डान्सरमधील मिथुनच्या परफॉर्मन्सनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. बॉलीवूडमध्ये ते गाणे हे आयकॉनिक मानले जाते. मिथुनची वेगळी स्टाईल, त्याची अदा हे सारं काही खूप लोकप्रिय झाले. आता मिथुन चक्क चीनमध्ये लोकप्रिय झाला आहे. त्याची गाणी त्या देशात गायली जात आहे. त्यापैकी जिम्मी जिम्मी हे गाणं तर खूप लोकप्रिय झाले आहे.

जिम्मी जिम्मीचे काय आहे कनेक्शन?

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिम्मी जिम्मी हे गाणे सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहे. त्या गाण्याचे बोल यातून विरोध केला जातोय. चीनच्या मँडेरिन भाषेमध्ये जी मी जी मी चा अर्थ होतो आम्हाला तांदुळ द्या....आम्हाला तांदुळ द्या. मिथुन आणि अभिनेत्री किम यांच्यावर प्रदर्शित झालेल्या जिम्मी जिम्मी गाण्यावर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे. कोरोनामुळे अगोदरच सर्व सामान्य नागरिकांचे झालेले हाल माहिती असताना सरकारच्या नव्या नियमावलीवर नागरिकांनी टीका केली आहे.

हेही वाचा: Shah Rukh Khan: काजोलसोबत 'बेड' सीन, शाहरुखनं तर...

गाण्यातून केला जातोय विरोध.....

चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोविडच्या धोरणांवर टीका होताना दिसते आहे. चीननं कोविडच्या संदर्भात ज्या पॉलिसी राबविण्यात आल्या त्याचा काही उपयोग झाला नाही. असे नागरिकांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली आहे. चीनच्या कम्युनिस्ट पार्टीनं सोशल मीडियावर वॉच ठेवण्यास सुरुवात केली आहे. कोविडच्या नियमांना ज्यांनी विरोध केला आहे त्यांच्यावर नजर ठेवली जात आहे. दुसरीकडे मिथुनच्या जिम्मी जिम्मी गाण्यातून जी मी जी मी असे म्हणत त्या पॉलिसीला विरोध केला जात आहे.

हेही वाचा: Shah Rukh Khan: Happy birthaday किंग खान !