दीपिकाचा ''मनरेगासाठी'' अर्ज ?; ये इंडिया है भाई यहॉ कुछ भी हो सकता है

युगंधर ताजणे
Friday, 16 October 2020

ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी मनरेगा योजना सुरु करण्यात आली आहे. आजमितीला लाखो बेरोजगार त्याचा लाभ घेत आहे. या योजनेच्या माध्यमातून रोजगार प्राप्ती झाल्याने योजना फायदेशीर ठरली आहे. मात्र यात झालेल्या या घोटाळ्यांमुळे योजनेला गालबोट लागले आहे.

मुंबई - भारतात काहीही होऊ शकतं याचा प्रत्यय एका वेगळ्या घटनेवरुन दिसून आले आहे. यापूर्वीही वाहन परवान्यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो, हयात नसलेल्या नावाच्या माणसांनी कर्जे काढल्याची प्रकरणे समोर आली आहेत. यामुळे आपली सरकारी यंत्रणा कायम टीकेची धनी झाली आहे. आता तर मनरेगाच्या कार्डावर बॉलीवूड अभिनेत्री दीपिकाचा फोटो आल्याने सरकारी कामाचा भोंगळपणा पुन्हा एकदा  समोर आला आहे.

मध्यप्रदेशातील एका ठिकाणी हा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे त्यातून लाखो रुपये काढल्याचीही बाब निदर्शनास आली आहे. आणखी धक्कादायक गोष्ट म्हणजे दहापेक्षा अधिक कार्डावर दीपिकाचा फोटो छापून आला आहे. आणि त्या कार्डाचा वापर करुन लाखो रुपये काढण्यात आले आहेत. ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी मनरेगा योजना सुरु करण्यात आली आहे. आजमितीला लाखो बेरोजगार त्याचा लाभ घेत आहे. या योजनेच्या माध्यमातून रोजगार प्राप्ती झाल्याने योजना फायदेशीर ठरली आहे. मात्र यात झालेल्या या घोटाळ्यांमुळे योजनेला गालबोट लागले आहे. यापूर्वीही फसवणूक आणि घोटाळे झालेल्या या योजनेत मध्यप्रदेशातील एका फसवणूकीच्या प्रकाराची भर पडली आहे.

या घटनेत संबंधित गावचा सरपंच, सेक्रेटरी, आणि इम्पॉलॉयमेंट अधिकारी यांनी एका कामगाराचा फोटो काढून तिथे अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचा फोटो लावला आहे.  यामुळे त्या कामगाराने प्रशासनाकडे तक्रार केली आहे. हे केवळ त्या कामगाराच्या बाबत घडले आहे असे नव्हे तर इतर 10 कार्डांवरही तिचे फोटो छापून आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मध्यप्रदेशातील पिंपरखेडा भागात हा प्रकार समोर आला आहे. संबंधित कामगार ज्यावेळी पैसे काढण्यासाठी बँकेत गेला असता त्याच्या खात्य़ात पैसे नसल्याचे दिसून आले. एका अभिनेत्रीचा फोटो वापरुन बँकेतून रक्कम लाटण्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने यावर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.

मोनू दुबे नावाच्या व्यक्तिसमोर दीपिकाचा फोटो लावण्यात आला आहे. तसेच त्याच्या खात्यातून 30 हजार रुपये काढण्यात आले आहे. प्रत्येक महिन्याला हा प्रकार घडत होता.असे मोनूने सांगितले आहे. यापूर्वीही जॅकलिन फर्नांडिझचा फोटो मनरेगाच्या कार्डावर आला होता. 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNREGA fraud Deepika Padukones photo used on fake job cards