esakal | Video : थ्रिलर, सस्पेन्सचा भरणा असलेल्या 'फ्लाइट'चा ट्रेलर पाहिलात का?

बोलून बातमी शोधा

flight movie}

हा चित्रपट येत्या १९ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

manoranjan
Video : थ्रिलर, सस्पेन्सचा भरणा असलेल्या 'फ्लाइट'चा ट्रेलर पाहिलात का?
sakal_logo
By
सकाळ ऑनलाइन

बॉलिवूड अभिनेता मोहित चड्डाचा आगामी चित्रपट 'फ्लाइट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. चित्रपटात जबरदस्त अॅक्शन आणि थ्रिलरचा भरणा असेल, हे ट्रेलर पाहून लक्षात येतंय. या चित्रपटाची कथा जितकी दमदार आहे, तितक्याच दमदार पद्धतीने त्याचं पडद्यावर चित्रण करण्यात आलं आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यापूर्वी त्याचा मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला गेला. या व्हिडीओच्या सुरुवातीला मोहितने विमानाचा बेल्ट पकडला आहे आणि मागून आवाज ऐकू येतो की, 'अभी मरने का मूड नहीं है'. 

यामध्ये मोहित हा रणवीर मल्होत्रा नावाची भूमिका साकारत आहे. विमानाच्या भीषण अपघातातून मोहित वाचतो आणि तिथूनच मूळ कथा सुरु होते. एका जंगलमध्ये हे विमान कोसळतं आणि नंतर या प्रकरणाची चौकशी सुरू होते. चौकशीदरम्यान विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडतो आणि त्यातून मोठं गूढ समोर येतं. 

हेही वाचा : 'टेनिस बनेगा बॅडमिंटन'; 'सायना' चित्रपटामुळे परिणिती ट्रोल

हा चित्रपट येत्या १९ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये मोहितसोबतच पवन मल्होत्रा, जाकिर हुसैन, शिबानी बेदी आणि प्रीतम सिंह यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती रोहित चड्डा आणि रिलायन्स एंटरटेन्मेंट करत आहेत.