हुडहुडी भरविणा-या थंडीत मोनालिसाचा 'करंट'

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 10 November 2020

सध्या हिंदीतील अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत. त्यांच्या तुलनेत मराठी वेब सीरिज आणि चित्रपट यांनी या माध्यमाचा म्हणावा अशापध्दतीने वापर केला नसल्याने त्यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत.

मुंबई - कोरोनाचा फटका सगळ्याच क्षेत्रांना बसला. त्याच्यातून सावरण्यासाठी त्यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहे. मनोरंजनाच्या क्षेत्राला मोठी झळ सोसावी लागत आहे. केवळ हिंदीच नव्हे तर मराठी चित्रपटांपुढील प्रश्न आणखी गंभीर झाला आहे. यासाठी निर्माते, दिग्दर्शक वेगवेगळ्या माध्यमांतून परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करत आहे.

सध्या हिंदीतील अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत. त्यांच्या तुलनेत मराठी वेब सीरिज आणि चित्रपट यांनी या माध्यमाचा म्हणावा अशापध्दतीने वापर केला नसल्याने त्यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. आता कुठे शासनाने थिएटर सुरु करण्याची परवानगी दिली असली तरी त्यातून निर्माते, दिग्दर्शक सावधगिरीने मार्ग काढताना दिसत आहेत. अनुप जगदाळे दिग्दर्शित 'करंट' हा चित्रपट 21 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.'झाला बोभाटा' आणि आगामी 'भिरकीट' या चित्रपटांचे दिग्दर्शक  जगदाळे हा नवा चित्रपट घेऊन येत आहेत. 'करंट' असे या चित्रपटाचे नाव आहे. अभिनेत्री मोनालिसा बागलची हिने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.

पुढील वर्षी म्हणजे 21 मे 2021 रोजी प्रदर्शित होणा-या या चित्रपटाचे एक हॉट पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ऐन थंडीच्या दिवसात मोनालिसाचा हॉट अंदाज दिसून आला आहे. त्याला रसिकांची चांगलीच पसंती मिळत आहे. रेहा फिल्म प्रॉडक्शनच्या दीक्षा युवराज सुरवाडे यांनी 'करंट' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे टीजर पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे सादर करण्यात आले.  सौंदर्याच्या जोरावर मोनालिसाचा चाहतावर्ग आहे. त्यामुळे तिच्या आगामी चित्रपटांविषयी जाणून घेण्याची चाहत्यांना कायमच उत्सुकता असते.  विशेष म्हणजे सध्या या चित्रपटाच्या नावाची चाहत्यांमध्ये  जोरदार चर्चा रंगली आहे.

'मिलिंदला झाले तरी काय, नाक टोचून काजळ लावले'

सौ. शशी देवधर या चित्रपटात तिने बालकलाकाराची भूमिका साकारली होती.अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘करंट’ या चित्रपटात मोनालिसा मुख्य भूमिका साकारणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं असून या पोस्टरमध्ये मोनालिसाचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे.

कमबॅकसाठी तनुश्रीने घटवलं 15 किलो वजन; पाहा कशी दिसते

उन्हाळ्यात प्रदर्शित होणा-या या चित्रपटाच्या पोस्टर प्रदर्शनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.  चित्रपटाची कथा नामदेव मुरकुटे यांची आहे.  सिनेमा करताना आम्ही दोनच नियम पाळतो, आमचा सिनेमा मनोरंजन करणारा असतो आणि पहिला नियम मी कधीच विसरत नसतो असे दिग्दर्शक अनुप जगदाळे यांनी सांगितले.  

  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: monalisa bagal current hot movie poster released