Money Shot: सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या ‘पॉर्न’ साईटचा प्रवास आता ओटीटीवर; वाचा कधी, कुठे रिलीज होणार ही डॉक्युमेंट्री?

'पॉर्न हब' या साईटवर बेतलेल्या या डॉक्युमेंट्रीमध्ये सुप्रसिद्ध पॉर्नस्टार्सचे अनुभव आहेत.
money shot the pornhub story official trailer out, documentary about biggest porn site in world on netflix
money shot the pornhub story official trailer out, documentary about biggest porn site in world on netflixsakal
Updated on

Money Shot Documentory: 'पॉर्न फिल्म्स' आणि त्या चालवणाऱ्या साइट्स हा भारतात तरी कायमच वादाचा आणि कळीचा मुद्दा राहिलेला आहे. भारतात अशा साइट्सवर बंदी देखील घालण्यात आली होती. पण अशाच एका साईटवर आता चक्क डॉक्युमेंटरी फिल्म तयार करण्यात आली आहे.

कित्येक ठिकाणी बंदी असली तरी आजही लोक सर्रास इंटरनेटवर पॉर्न बघत असतात. लाखों नव्हे तर कोट्यवधी युजर या साईटला दिवसाला भेट देत असतात. याच पॉर्न विश्वातील एक सर्वाधिक पाहिली जाणारी साईट म्हणजे 'पॉर्नहब'.

ही साईट जगभरातील नेटकऱ्यांमध्ये फारच प्रचलित आहे. पॉर्न आशय निर्माण करणारी आणि सर्वाधिक प्रेक्षक मिळवणारी क्रमांक 1 ची साईट म्हणून त्याकडे पाहिले जाते. याच वेबसाईटचा प्रवास मांडणारी एक डॉक्युमेंटरी लवकरच आपल्या भेटीला येणार आहे.

money shot the pornhub story official trailer out, documentary about biggest porn site in world on netflix
A. R. Ameen: थोडक्यात वाचला! ए. आर. रहमान यांचा मुलगा आमीनचा शूटिंगदरम्यान अपघात..

या माहितीपटात या वेबसाईटचा प्रवास तसेच यश- अपयश, काही अनुभव आणि आलेल्या अडचणी या विषयी भाष्य करण्यात आलेले आहे. ‘मनी शॉट : द पॉर्नहब स्टोरी’ हे या डॉक्युमेंट्रीचं नाव आहे आहे. पॉर्नसाईट विषयी समज - गैरसमज याविषयावर देखील या माहितीपटातून लक्ष वेधण्यात आले आहे.

पॉर्न इंडस्ट्रीमुळे निर्माण झालेली सेक्स ट्रॅफिकिंगची समस्या, सेक्स वर्कर आणि पॉर्नस्टार्समध्ये होणारी गल्लत आणि याचा या क्षेत्रातील कलाकारांना बसणारा फटका हे सगळं यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे.

या डॉक्युमेंट्रीमध्ये काही सुप्रसिद्ध पॉर्नस्टार्सनी आपले अनुभव शेअर केले आहेत. याबरोबरच या इंडस्ट्रीतील बऱ्याच अज्ञात गोष्टींचा उलगडा या माहितीपटात होणार आहे. येत्या १५ मार्चपासून ही डॉक्युमेंट्री नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघायला मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com