जातिवाचक टिप्पणी : ‘बबिता’ची अंतरिम जामिनावर सुटका; तब्बल चार तास चौकशी

Munmun Dutta
Munmun DuttaMunmun Dutta

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेची अभिनेत्री मुनमुन दत्ता (Moonmoon Dutta) एका कथित जातिवाचक टिप्पणीप्रकरणी सोमवारी हरियाणा पोलिसांसमोर (hariyana police) हंसी येथे हजर झाली. सुमारे चार तास तपास अधिकाऱ्यांनी तिची चौकशी केली. यानंतर अंतरिम जामिनावर तिची सुटका झाली. अभिनेत्री तिचे वकील आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांसह पोलिस उपअधीक्षक विनोद शंकर यांच्या कार्यालयात पोहोचली. यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला नाही.

९ मे २०२१ रोजी मुनमुन दत्ताने यू-ट्यूब चॅनलवर टिप्पणी केली होती. यामुळे १३ मे रोजी हांसी येथे तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोशल मीडियावर तिच्या अटकेची मागणी होऊ लागली होती. यानंतर मुनमुन दत्ताने (Moonmoon Dutta) भाषा न समजल्याने अशी टिप्पणी केल्याचे म्हणत माफी मागितली होती. कोणाचीही भावना दुखावण्याचा आपला हेतू नसल्याचे तिने सांगितले होते.

Munmun Dutta
REET Exam Level 2 : विरोधी पक्ष, उमेदवारांचा विरोध पाहता परीक्षा रद्द

मुनमुन दत्ताचा अटकपूर्व जामीन अर्ज २८ जानेवारी रोजी हिस्सार येथील एससी एसटी कायद्यांतर्गत स्थापन केलेल्या विशेष न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर तिने अटकपूर्व जामिनासाठी पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली होती. हायकोर्टाने अभिनेत्रीला हांसी येथील तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहून तपासात सहभागी होण्यास सांगितले होते. त्यानुसार दत्ता (Moonmoon Dutta) तपास अधिकाऱ्यांसमोर हजर (hariyana police) झाली. मुनमुन दत्ताला अटक करून चौकशी केल्यानंतर अंतरिम जामिनावर सुटका करण्यात आली.

जामिनाची तरतूद नाही

२५ फेब्रुवारीला तपास अहवाल न्यायालयात सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांना दिले होते. दरम्यान, तक्रारदार रजत कलसन यांनी एससी एसटी कायद्यात अंतरिम जामिनाची तरतूद नसल्याचे म्हटले आहे. या विरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे मुनमुन दत्ताचा हा वाद चांगलाच तापला होता. मात्र, अभिनेत्रीने (actress) माफी मागितल्यानंतर शांतही झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com