"द मदर'मधून रविनाचे कमबॅक 

वृत्तसंस्था
सोमवार, 16 जानेवारी 2017

"तू चिज बडी है मस्त मस्त' या गाण्याने बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घातला आणि या गाण्यावर ठुमके लगावणारी रविना हिट झाली. बराच काळ मोठ्या पडद्यापासून लांब राहिलेली रविना आता कमबॅक करतेय ती"द मदर' या चित्रपटातून. हा चित्रपट स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांवर भाष्य करणारा आहे. हल्ली रविना सोशल वर्कमध्ये बिझी असते, हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे अशा विषयावरचा चित्रपट ही तिच्यासाठी सुवर्ण संधीच म्हणायला हवी. मायकल पल्लीको लिखित आणि अशतर सय्यद निर्मित या चित्रपटात महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराविरोधात त्यांच्या न्यायासाठी सुरू असलेल्या संघर्षगाथा पाहायला मिळणार आहेत.

"तू चिज बडी है मस्त मस्त' या गाण्याने बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घातला आणि या गाण्यावर ठुमके लगावणारी रविना हिट झाली. बराच काळ मोठ्या पडद्यापासून लांब राहिलेली रविना आता कमबॅक करतेय ती"द मदर' या चित्रपटातून. हा चित्रपट स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांवर भाष्य करणारा आहे. हल्ली रविना सोशल वर्कमध्ये बिझी असते, हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे अशा विषयावरचा चित्रपट ही तिच्यासाठी सुवर्ण संधीच म्हणायला हवी. मायकल पल्लीको लिखित आणि अशतर सय्यद निर्मित या चित्रपटात महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराविरोधात त्यांच्या न्यायासाठी सुरू असलेल्या संघर्षगाथा पाहायला मिळणार आहेत. रविना यापूर्वी आपल्याला रणबीर कपूर आणि अनुष्का शर्माच्या"बॉम्बे व्हेलवेट' या चित्रपटात दिसली होती."द मदर' या चित्रपटातील भूमिकेबद्दल रविना म्हणते,""समाधानकारक कथानक असल्याने मी हा रोल स्वीकारला. समाजात महिलांची सुरक्षा महत्त्वाची आहे, असेही ती म्हणाली. 21 एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: The mother ravina come back