Mouni Roy : मौनी रॉयने लावली सोशल मीडियावर आग; शेअर केले हॉट फोटो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mouni Roy

मौनी रॉयने लावली सोशल मीडियावर आग; शेअर केले हॉट फोटो

मुंबई : छोट्या पडद्यापाठोपाठ बॉलिवूडमध्येही धुमाकूळ घालणारी मौनी रॉय (Mouni Roy) तिचे एकापेक्षा एक बोल्ड फोटो (Hot photo) शेअर करून लोकांच्या होश उडवत आहे. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर होतात. मौनीने नुकतेच इंस्टाग्राम पेजवर (social media) काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती बोल्ड दिसत आहे.

मौनी रॉय तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने इंस्टाग्राम पेजवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती नेहमीप्रमाणेच खूप बोल्ड दिसत आहे. या फोटोंमध्ये मौनी समुद्राच्या मध्यभागी निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये बोल्ड पोझ देत आहे. ती परफेक्ट बॉडी फ्लॉंट करताना दिसत आहे.

हेही वाचा: उमेदवार बदलल्याने काँग्रेसचे तीन नेते आले अडचणीत!

फोटो शेअर करताना मौनीने राल्फ वाल्डो इमर्सनचा एक कोट शेअर केला आहे, ज्यात ‘सूर्याच्या उन्हात राहा, समुद्रात पोहा, जंगली हवा घ्या’ असे लिहिले आहे. फोटोंमध्ये ती समुद्राच्या मध्यभागी असलेल्या झुल्यावर झुलताना दिसत आहे. फोटोंमध्ये मौनीचा सिझलिंग अवतार पाहायला मिळत आहे. मौनीने एकत्र अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.

मौनीचे हे बोल्ड फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. काही तासांतच मौनीच्या या पोस्टवर एक लाखाहून अधिक लाईक्स आले आहेत. दुसरीकडे, लोक कमेंट बॉक्समध्ये सतत प्रतिक्रिया देत आहेत. चाहत्यांसोबतच सर्व यूजर्सनाही फोटोंवरून नजर हटवणे कठीण झाले आहे. मौनी लवकरच अभय देओलसोबत ‘वेले’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती कॅमिओ भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय ती बऱ्याच दिवसांपासून अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’च्या रिलीजची वाट पाहत आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Web Title: Mouni Roy Actress Hot Photo Social Media Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top