Mouni Roy: आई होण्याविषयी मौनीचा मोठा खुलासा; म्हणाली,'लग्नाला ८ महिने झालेयत आणि..' Brahmastra Actress | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mouni Roy On pressured to embrace motherhood

Mouni Roy: आई होण्याविषयी मौनीचा मोठा खुलासा; म्हणाली,'लग्नाला ८ महिने झालेयत आणि..'

Mouni Roy: मौनी रॉय सध्या 'ब्रह्मास्त्र'(Brahmastra) सिनेमातील तिच्या सिनेमामुळे भलतीच चर्चेत आहे. सिनेमाला चांगलं यश मिळत आहे आणि त्यामुळे मौनीच्या करिअरलाही याचा फायदा होणार यात काहीच शंका नाही. सध्या मौनीच काय सिनेमाची सगळीच टीम ब्रह्मास्त्रचं यश एन्जॉय करत आहेत. यादरम्यान मौनीला सोशल मीडियावर अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील ट्रोल केलं गेलं. या ट्रोलिंगचा आपल्याला काहीच फरक पडत नाही,आपण ते मनावर घेत नाही असं स्पष्ट उत्तर मौनीनं एका मुलाखतीत दिलं आहे. (Mouni Roy On pressured to embrace motherhood)

हेही वाचा: Video: जिच्या हसण्यावर भलेभले व्हायचे फिदा,त्याच माधुरीला हे आज काय ऐकावं लागतंय...

याच मुलाखतीत मौनीनं लग्नानंतरच्या वैवाहिक आयुष्यावरही भाष्य केलं आहे. जेव्हा तिला विचारलं गेलं की लग्नानंतर आई कधी होणार या प्रश्नाचा ताण तिच्यावर आहे का. कारण एक सेलिब्रिटी म्हटल्यावर हा प्रश्न अनेकदा चाहत्यांकडूनही विचारला जातो किंवा अनेकदा यावरनं ट्रोल केलं जातं. त्यावर उत्तर देताना मौनी म्हणाली, ''मला याविषयी घरातनं तरी कधीच कुणी विचारलं नाही. माझे कुटुंब माझ्या कामाचा आदर करतात, मी जे काही आता करतेय त्याचं महत्त्व ते जाणतात,आमच्या लग्नाला आठ महिने झालेयत,आणि आम्ही हळहळू आमच्या या नव्या आयुष्यात स्थिर होत आहोत''.

हेही वाचा: 'तर आज मी देखील असते बॉलीवूड वाईफ..', चंकी पांडेचं नाव घेत एकताची हैराण करणारी पोस्ट

यावेळी मौनीनं आपल्या सासरच्या मंडळींविषयी देखील बोलणं पसंत केलं. मौनी म्हणाली, ''माझ्या सासू-सासऱ्यांनी माझा 'ब्रह्मास्त्र' सिनेमा पाहिला,तो पण ३ वेळा,त्यांच्या वेगवेगळ्या मित्र-परिवारासोबत. आणि त्यांनी प्रत्येक वेळेला सिनेमा पाहिल्यानंतर मला खूप सारे किसेस इमोजी पाठवले''.

आपल्या हॉलिडेविषयी बोलताना मौनी म्हणाली,''मी दरवेळेस आमचे हॉलीडे प्लॅन करते,पण अनेकदा जेव्हा सूरज कोणत्याही प्लॅन शिवाय हॉलीडेला जायचं ठरवतो तेव्हा ते तसे हॉलीडे मी अधिक एन्जॉय करते''. आता मौनीनं हे असं सगळं बोलून सध्या तरी आपल्याला आई व्हायची घाई नाही हे स्पष्ट केलंय आणि ट्रोलर्सला मौनी फाट्यावर मारते हे देखील समजलं आहे.