थोडक्यात वाचली मौनी रॉय ; पाहा व्हिडीओे

Mouni roy faced accident
Mouni roy faced accident

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय हीच्यासोबत आज एक भयंकर हादसा घडला 
आहे. मुंबईतील जुहू परिसरातील मेट्रोच्या बांधकामामुळे मौनीच्या गाडीवर मोठा दगड कोसळला. यामध्ये तिच्या कारच्या सन रुफचं नुकसान झालं आहे. सुदैवाने या अपघातात तिला कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. आजच ट्रेलर प्रदर्शित झालेल्या 'मेड इन चायना' या चित्रपटाच्या लॉंच कार्यक्रमासाठी ती निघाली होती. 

मौनीने तिच्यासोबत झालेल्या या हादस्याचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत अपघाताची माहिती दिली. या ट्विटमध्ये तिनं लिहीलं आहे की, ' जुहू सिग्नला गाडी थांबली असताना 11 व्या मजल्याच्या उंचीवरुन भला मोठा एक दगड गाडीवर कोसळला. मी त्यावेळी काहीच करु शकले नसते. मात्र विचार करा जर कोणी हा रस्ता ओलांडत असता तर किती मोठा अपघात घडला असता. मुंबई मेट्रोच्या या निष्काळजीपणाचं काय कराव कोणी सांगू शकतं का ?'

व्हिडीओ पाहिल्यावर असं वाटतं नागिनची कलाकार मौनी या अपघातमधून थोडक्यात बचावली आहे. अभिनेत्री मौना याआधी अक्षय कुमारसोबत 'गोल्ड' या चित्रपटामध्ये दिसली होती. नुकताच तिचा आगामी चित्रपट 'मेड इन चायना' चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांकडून ट्रेलरला पसंती मिळत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com