Movie Review : 'डार्लिंग' प्रेमाचा त्रिकोण

झिम्मा व पांडू या चित्रपटांबरोबरच डार्लिंग हा मराठी चित्रपट आता चित्रपटगृहात प्रदर्शित
Movie Review : 'डार्लिंग' प्रेमाचा त्रिकोण
Movie Review : 'डार्लिंग' प्रेमाचा त्रिकोणsakal

हिंदीबरोबरच आता मराठी चित्रपटदेखील एकापाठोपाठ एक प्रदर्शित होत आहेत. झिम्मा व पांडू या चित्रपटांबरोबरच डार्लिंग हा मराठी चित्रपट आता चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. समीर आशा पाटीलने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. कलाकारांची मोठी फौज त्याने या चित्रपटात घेतली आहे आणि निखळ करमणूक करणारा असा चित्रपट बनविला आहे. या चित्रपटात प्रेमाचा त्रिकोण दाखविण्यात आला आहे.

'डार्लिंग' प्रेमाचा त्रिकोण
'डार्लिंग' प्रेमाचा त्रिकोणsakal

ही कथा आहे बबलीची....ही कथा आहे राजाभाऊची आणि तुषारची. त्यांच्या अल्लड आणि अवखळ अशा प्रेमाची. बबली (रितिका श्रोत्री( ही एक अनाथ मुलगी असते. तिचे पालनपोषण अण्णा (मंगेश कदम) आणि त्यांच्या पत्नीने (आभा वेलणकर) यांनी केलेले असते. आता बबली वयात आल्यामुळे तिचे दोनाचे चार हात व्हावेत अशी त्यांची इच्छा असते. साहजिकच ते बबलीसाठी विविध स्थळे पाहात असतात. ज्योतिषी (आनंद इंगळे) यांना जाऊन भेटतात आणि त्यांचाही सल्ला घेतात. परंतु बबली ही तुषारच्या (प्रथमेश परब) प्रेमात पडलेली असते. तुषार हा इंजिनियरिंगचे शिक्षण घेत असतो. त्या दोघांचे एकमेकांवर अतोनात प्रेम असते. बबली तुषारला पळून जाऊन लग्न करूया असेही सांगते. परंतु तुषार तसे काही धाडस करीत नाही. मात्र जेव्हा बबलीचे लग्न आता जमणार आहे असे त्याला समजते तेव्हा तो हालचाली सुरू करतो.

Movie Review : 'डार्लिंग' प्रेमाचा त्रिकोण
मालिकेच्या एका एपिसोडसाठी अंकिताचं मानधन थक्क करणारं!

राजाभाऊ (निखिल चव्हाण) देखील बबलीवर प्रेम करीत असतो. त्याचे हे प्रेम एकतर्फी असते. तोदेखील बबलीसाठी गटविण्यासाठी विविध प्रकारच्या क्लृप्त्या करीत असतो. त्यातून तो बबलीच्या घरात एन्ट्री करतो. त्याची आणि बबलीची भेट होते. बबलीचे वडील अण्णा या राजाभाऊवर भलतेच खुश असतात. एकीकडे राजाभाऊचे बबलीवर असलेले एकतर्फी प्रेम आणि दुसरीकडे तुषारची बबलीसाठी भेटण्याकरिता चाललेली धडपड तसेच अण्णांनी अर्थात बबलीच्या वडिलांनी तिचे ठरविलेले लग्न...त्यातच बबलीची पळून जाऊन लग्न करण्याचा विचार...असा सगळा मामला विनोदाच्या अंगाने या चित्रपटात पाहायला मिळतो.

प्रथमेश परब, रितिका श्रोत्री, निखिल चव्हाण, मंगेश कदम, आनंद इंगळे अशा सगळ्याच कलाकारांनी या चित्रपटात कमालीच्या गमतीजमती केल्या आहेत. दिग्दर्शक समीर आशा पाटीलने प्रेक्षकांना अधिकाधिक हास्याचा डोस कसा देता येईल हेच पाहिले आहे. प्रथमेश परब आणि रितिका श्रोत्री ही जोडी टकाटक या चित्रपटामुळे कमालीची लोकप्रिय आहे. त्यांनी या चित्रपटातदेखील उत्तम कामगिरी केली आहे. परंतु काही ठिकाणी रितिकाचा अभिनय अतिरंजित वाटतो. तरीही तिने बबलीच्या भूमिकेतील आपले नाणे खणखणीत वाजविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com