esakal | 'पिता को पता है की, पिता कौन है'
sakal

बोलून बातमी शोधा

'पिता को पता है की, पिता कौन है'

'पिता को पता है की, पिता कौन है'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - आपल्या वादग्रस्त विधानांमुळे अभिनेत्री नुसरत जहा ही नेहमीट वादात सापडल्याचे दिसून आले आहे. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी ही अभिनेत्री तृणमूल कॉग्रेसची खासदार आहे. मात्र राजकारण आणि समाजकारण या दोन्ही क्षेत्रामध्ये ती कमालीची लोकप्रिय झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून नुसरत तिच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. तिचं म्हणणं आहे की, मी आता पुन्हा नव्यानं सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या बाळाचे वडिल कोण यावरुन तिला ट्रोल करण्यात आले होते. अशावेळी ट्रोलिंग करणाऱ्यांनी मर्यादा ओलांडली होती. यावेळी नुसरतनं आपल्यावर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तरही दिलं होतं. दरवेळी आपल्याला टोकाचं वक्तव्य करता येत नाही. ज्या मतदारांनी मला मतदान केलं पाहिजे त्यांच्या मताचा आदर राखायला हवा. असं तिनं सांगितलं होतं.

26 ऑगस्टला नुसरतला पुत्ररत्न झाले. त्याचे नाव यिशान असे आहे. मात्र त्यावरुन तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले होते. तिनं त्यावरुन अनेकदा ट्रोल करणाऱ्यांना सुरुवात केली होती. आता ती पुन्हा चर्चेत आली आहे. नुकतचं तिच्या हस्ते कोलकातामध्ये एका दुकानाचे उद्धघाटन करण्यात आले. त्यावेळी तिनं एक धक्कादायक विधान केलं होतं. एनडीटीव्हीशी तिनं ही बातचीत केली होती. ती म्हणाली, आता खूप चांगले वाटत आहे की, मी नवीन सुरुवात केली आहे. आयुष्याची पुन्हा नव्यानं केलेली सुरुवात हे छान वाटत आहे. आता माझ्या काही जबाबदाऱ्या आहेत. त्या मला पूर्ण करायच्या आहेत. त्यासाठी मी पुन्हा सुरुवात केली आहे. मला कल्पना आहे की, माझ्याविषयी लोकं काय बोलतात ते, मात्र मी त्याचे काही वाईट वाटून घेत नाही. त्यांना जे बोलायचं आहे त्यांनी ते बोलावं, मी त्यावर प्रतिक्रिया देणं फारसं महत्वाचं नाही. असे मला वाटते.

काहीही झालं तरी मला माझे मानसिक संतुलन चांगले ठेवायचे आहे. त्यासाठी मला अधिक खंबीर व्हावं लागेल. अजून मी चित्रपटांमध्ये काम करण्याच्या दृष्टीनं काही विचार केलेला नाही. पतीपासून वेगळं झाल्यानंतर तिनं त्यावर स्पष्टपणे प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यावर ती म्हणाली, वडिलांनाच माहिती आहे की, वडिल कोण आहे ते, तिचं ते विधान सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. त्यावर तिच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट दिल्या आहेत. वैयक्तिक कारणास्तव नुसरतनं पावसाळी अधिवेशनात भाग घेतला नव्हता. त्यावरुनही तिनं विरोधकांना फटकारलं होतं.

हेही वाचा: बाळाच्या वडिलांबद्दल पहिल्यांदाच व्यक्त झाल्या नुसरत जहां

हेही वाचा: नुसरत जहां झाली आई; मुलाला दिला जन्म

loading image
go to top